
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. भारताच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट केले. भारताच्या हवाई हल्ल्यात १०० हून दहशतवादी ठार झाले. यात कंधार विमान अपहरणाचा सूत्रधार आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ रौफ अझहरचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु असल्याचे वक्तव्य केले आहे.
अब्दुल रौफ अझहर हा जैश ए मोहम्मद संस्थेतील दहशतवादी होता. आयसी-८१४ विमानाच्या अपहरण प्रकरणात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हायजॅकचा तो मास्टरमाईंड होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात रौफ अझहर मारला गेल्याचे म्हटले जात आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेतील प्रमुख दहशतवादी उमर सईदला सोडवण्यासाठी आयसी-८१४ विमान अपहरण रौफ अझहरने घडवून आणले होते. यानंतर त्याने उमर सईद शेखने वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या अमेरिकन-ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. डॅनियल पर्लच्या हत्येनंतर अमेरिकेसह जगभरात खळबळ माजली होती. पर्लच्या मृत्यूमागेही अब्दुल रौफ अझहर होता असे म्हटले जाते.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचे प्रत्त्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना अशा भारतातील १५ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एस-४०० (सुदर्शन चक्र) या प्रणालीने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे वेळीच निष्क्रिय केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.