Beed News : बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग, पोलिसांना कुणकुण, धाड टाकली अन्...

Beed Crime News : बीड शहरातील मध्यवर्ती भागात स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग सुरु होते. स्पा सेंटरच्या तळघरात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीड शहरातील मध्यवर्ती भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी स्पा सेंटरवर मोठी कारवाई केली आहे. ब्लीस स्पा नावाच्या सेंटरच्या तळघरात हा बेकायदेशीर प्रकार सुरु होता. कारवाई अंतर्गत पोलिसांना स्पा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील सारडा कॅपिटल परिसरात ब्लीस स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. स्पाच्या तळघरामध्ये मागील काही दिवसांपासून हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून काल (७ मे) रात्री ८ च्या सुमारास कारवाई केली. कारवाईत चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Beed Crime News
Beed News : उलट्या, जुलाब, पोटदुखी; गावजेवणातून ५० जणांना विषबाधा, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडला प्रकार

कारवाईदरम्यान बीड पोलिसांनी नाशिक येथील एका पीडित महिलेची सुटका केली. पीडित महिलेला जबदस्तीने या व्यवसायामध्ये ढकलले गेल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed Crime News
Operation Sindoor नंतर मुलानं दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, मुस्लिम तरुणानं केला चाकू हल्ला

बीड शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सारडा कॅपिटल येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी या सेंटरवर छापा मारला. यात पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली, तर चालकाला ताब्यात घेतले.

Beed Crime News
Rohit Sharma चा मोठा निर्णय, कसोटी क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती, कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com