Pakistan Rawalpindi Stadium Destroyed
Pakistan Rawalpindi Stadium DestroyedSaam Tv News

India-Pakistan War : भारताचं Operation Sindoor सुरुच; पाकमधलं रावळपिंडी मैदान उद्ध्वस्त, आज होणार होता PSLचा सामना; VIDEO

Pakistan Rawalpindi Stadium Destroyed : भारताने थेट पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला केलाय. रावळपिंडी क्रिकेट ग्राऊंडपासून १०० मीटर असलेल्या ठिकाणी हा ड्रोन हल्ला करण्या आलेला आहे. त्यामुळे रावळपिंडीचं मैदान उद्ध्वस्त झालंय.
Published on

इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणाव वाढलाय. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं जात आहे. भारतासोबत तणाव अधिक तीव्र झाला असतानाच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. भारताने थेट पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला केलाय. रावळपिंडी क्रिकेट ग्राऊंडपासून १०० मीटर असलेल्या ठिकाणी हा ड्रोन हल्ला करण्या आलेला आहे. त्यामुळे रावळपिंडीचं मैदान उद्ध्वस्त झालंय.

आज या मैदानावर पाकिस्तान सुपर लिगचे (PSL) सामने सुरु होते. आता या मैदानावरील सर्व सामने हे कराचीमध्ये होणार आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलं की, ८ मे २०२५ रोजी पहाटे पाकिस्तानातील अनेक हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, यामध्ये लाहोर येथील एक हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती बंद केली. तसेच, लाहोरमध्ये आज ८ मे रोजी सकाळी स्फोटांचा आवाज ऐकू आला, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे.

Pakistan Rawalpindi Stadium Destroyed
Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन 'सिंदूर'मुळे अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याची सूचना

आज झालेल्या ड्रोन हल्ल्यात हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसलाय. चिनी एचक्यू-९ ड्रोन हल्ल्यात खराब झालीय. हा पाकिस्तानला सर्वात मोठा झटका मानला जातोय. चीनच्या एयर डिफेन्स सिस्टमचं नुकसान झाल्याचा रिपोर्ट खरा असेल तर पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तान चीनचे एयर डिफेन्स सिस्टमचा वापर करतो, पाकिस्तानकडे ८० टक्के शस्त्रे ही चिनी डिफेन्सवर चालणारी आहेत.

Pakistan Rawalpindi Stadium Destroyed
Opration Sindoor: ऑपरेशन सिंदूर सुरूच, भारताने पाकची रडार सिस्टिम ड्रोनद्वारे उडवली| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com