पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर 2.0 का केलं? भर पत्रकार परिषदेत भारतानं पाकड्यांना उघडं पाडलं

Operation Sindoor नंतर पाकिस्तानने पुन्हा कुरघोड्या करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने प्रत्त्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने आपली बाजू मांडत पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
Operation Sindoor 2.0
Operation Sindoor 2.0Saam Tv
Published On

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्डे उद्ध्वस्त केले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने कुरघोडी करायला सुरुवात केली. त्यांनी सीमावर्ती भागांत गोळीबार केला. भारतात अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या कुरघोड्यांनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत भारताची बाजू मांडत पाकिस्तानची पोलखोल केली.

पत्रकार परिषदेमध्ये सोफिया कुरेशी म्हणाल्या, 'ऑपरेशन सिंदूर ७ मे २०२५ ला झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान भारताने आपली प्रतिक्रिया केली होती. पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला नव्हता. फक्त दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले होते हे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते. सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला केल्यास, शस्त्रसंधीचे उल्लंधन केल्यास भारताकडून प्रत्त्युत्तर दिले जाईल हे देखील सांगण्यात आले होते. उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्कराच्या ठिकाणांवर श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड, नल, फलौदी, उत्तरलाई, अवंतीपुरा आणि भुज या लष्कराच्या ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल्सद्वारे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यावर भारताने वायुदलाने प्रत्त्युत्तर दिले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा पुरावा हे अवशेष आहेत.' सोफिया कुरेशीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी २४ तासांत काय-काय घडले याची माहिती दिली.

Operation Sindoor 2.0
India-Pakistan War : भारताचं Operation Sindoor सुरुच; पाकमधलं रावळपिंडी मैदान उद्ध्वस्त, आज होणार होता PSLचा सामना; VIDEO

'पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला टार्गेट करण्यात आले आहे. पाकिस्तानचा भारताच्या अनेक भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पाककडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकच्या गोळीबारात १६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. भारताला तणाव वाढवायाचा नाही पण पाकिस्तानने त्याचा आदर करावा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करु नये. पहलगाम हल्ल्याने तणाव वाढला. त्याचं उत्तर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिले', असे वक्तव्य परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी केले.

Operation Sindoor 2.0
Rauf Azhar : रौफ ढगात, खौप संपला; कंदाहार हायजॅक प्रकरणातील दहशतवादी रौफ अझहरला धाडलं यमसदनी

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने १५ भारतीय ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एस-४०० (सुदर्शन चक्र) या प्रणालीसमोर त्यांची सर्व क्षेपणास्त्रे अपयशी ठरली आहेत. पाकिस्तानने रात्री उशिरा भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेपणास्त्रे हल्ल्याद्वारे भारताचे मोठे नुकसान करण्याचा पाकिस्तानचा प्लान होता. पण त्याचा हा प्लान फसला.

Operation Sindoor 2.0
Jalgaon News : अंगावरची हळद ओली, सीमेवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल; नववधू म्हणाली 'Operation Sindoor'साठी माझं सौभाग्य पाठवतेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com