Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय क्रॅक केली UPSC; दुसऱ्याच प्रयत्नात IAS; राधिका गुप्ता यांचा प्रवास

Success Story of IAS Radhika Gupta: आयएएस राधिका गुप्ता यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या ज्या जिल्ह्यात राहतात तिथे साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळेच त्यांनी जिद्दीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे खूप जास्त कठीण असते. परंतु अनेकांचे ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करुन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न असते. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत करतात आणि इतरांसमोर आदर्श ठेवतात. असंच काहीसं आयएएस राधिका गुप्ता यांनी केलं. त्यांनी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला.

Success Story
Success Story : पुण्यातील होमगार्डच्या लेकाने देशात नाव गाजवलं; खडतर प्रवासात जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये मोठं यश

आयएएस राधिका गुप्ता यांचा प्रवास

आयएएस राधिका गुप्ता (IAS Radhika Gupta) या मध्य प्रदेशमधील अलीराजपुर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी एसजीएसआयटीएस इंदोर येथून मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी डिग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेट फर्ममध्ये काम केले.

नोकरी करत असताना त्यांना त्यांच्या स्वप्नांची आठवण झाली. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्याचवेळ त्यांना राजेंद्र नगरबद्दल माहिती मिळाली. तिथे त्यांनी कोचिंग क्लासबद्दल माहिती घेतली. त्यांनी पूर्णरणे अभ्यासक्रम समजून घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या इंदोरला परत आल्या.

राधिका यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. पहिल्या प्रयत्नात त्यांना रेल्वेत काम करायची संधी मिळाली. परंतु त्यांचे स्वप्न हे आयएएस होण्याचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि क्रॅक देखील केली. त्यांच्या या जिद्दीचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

Success Story
UPSC Success Story: जिद्द! सलग चारवेळा अपयश, हार मानली नाही, पाचव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; प्रयागराजची शक्ति दुबे देशात पहिली

राधिका यांनी त्यांच्या यशाबद्दल सांगितले होते की, मी एका अशा जिल्ह्यामधून येते की जिथे साक्षरता दर खूप कमी आहे.यामुळेच मला प्रेरणा मिळाली. मला माझ्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्वाचे कळले. या परीक्षेमुळे मला धैर्य आणि दृढता शिकवली आहे. राधिका यांनी यूपीएससी परीक्षेत १८वी रँक प्राप्त केली आहे.

Success Story
UPSC Success Story: ब्युटी विथ ब्रेन! दररोज १२-१३ तास अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात IAS; रिया डाबी यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com