Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वा रे पठ्ठ्या! ब्रेकअप के बाद थेट IAS; दोनदा अपयश आल्यानंतर UPSC क्रॅक, आदित्य पांडे यांची यशोगाथा वाचा

Success Story of IAS Aditya Pandey: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप जिद्द लागते. अशाच जिद्दीने आयएएस आदित्य पांडे यांनी यूपीएससी क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. ही परीक्षा देण्यासाठी जिद्द लागते. अशीच जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आदित्य पांडे हे आयएएस अधिकारी झाले आहेत. त्यांच्या आयएएस होण्यामागे त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडचा खूप मोठा हात आहे. (Success Story)

आयएएस आदित्य पांडे यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. आदित्य पांडे यांनी यूपीएससी परिक्षेत ४८ वी रँक मिळवली आहे. आदित्य सिंग पांडे यांचे एका मुलीवर खूप प्रेम होते. परंतु त्यांचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या वेळी त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांनी हिणवले होते. आयुष्यात काहीतरी मोठे करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

आदित्य पांडे हे गरीब कुटुंबातून येतात. त्यांनी इंजिनियरिंग आणि एमबीए केले. त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले. तरीही ते डगमगले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. (Success Story Of IAS Aditya Pandey)

आयएएस आदित्य पांडे (IAS Aditya Pandey)यांना तीन बहिण आणि एक भाऊ होता.ते शिक्षणासाठी जामनगर येथे गेले. त्यांनी ८वी आणि ९वीत चांगले गुण मिळवले होते. परंतु १० वी त्यांना कमी गुण मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा पाटणा येथे पाठवले.

१२ वी पास केल्यानंतर वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेतले. या काळात त्यांचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले. त्यामुळे ते खूप दुः खी झाले. या काळात त्यांनी यूपीएससीबाबत ऐकले होते. परंतु त्यांना याबाबत फार माहित नव्हतं.

आदित्य पांडे हे २०२१ आणि २०२२ साली यूपीएससी (UPSC Success Story) परिक्षेत अयशस्वी ठरले. परंतु ते निराश झाले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. त्यांना अनेकदा नकारात्मक गोष्टी ऐकायला लागले. परंतु त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी यूपीएससी परिक्षेत ४८ वी रँक मिळवली. त्यांनी कोचिंगसोबतच सेल्फ स्टडीवर जास्त फोकस केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT