UPI News  Saam Digital
बिझनेस

UPI News : RBI चा मोठा निर्णय: UPI च्या सुविधांमध्ये महत्त्वाचा बदल; ग्राहकांना काय होणार फायदा?

UPI Payment Rule: यूपीआय युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही एका डिजिटल वॉलेटवरुन दुसऱ्या यूपीआय अॅपवर पेमेंट करु शकतात. याआधी फक्त बँकेतून पेमेंट करु शकत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता यूपीआय पेमेंट केवायसी प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सद्वारेदेखील केले जाई शकते. PPI मध्ये डिजिटल वॉलेटचा समावेश होतो. पीपीआयद्वारे फोन पे, पेटीएम आणि गुगल पे वापरले जाते. ही सुविधा थर्ड पार्टी अॅपद्वारे उपलब्ध आहे.

आता तुम्हाला थर्ड पार्टी अॅपवरुन पेमेंट करता येणार आहे. याआधी यूपीआय पेमेंट फक्त बँक खात्यातून करता येत होते. PPI द्वारे पेमेंट करण्यासाठी पीपीआयने जारी कलेले अॅप वापरावे लागतात. मात्र, आता नियम बदलणार आहे. डिजिटल वॉलेट युजर्संना पीपीआयवर अवलंबून राहावे लागणार आहे.

आता युजर्स कोणत्याही थर्ड पार्टी अॅपवरुन UPIद्वारे वॉलेटमधून पेमेंट करु शकतात. रिझर्व्ह बँकेने २७ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे.ही सुविधा गिफ्ट कार्ड, मेट्रो कार्ड आणि डिजिटल वॉलेट धारकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी ग्राहकांना PPI हा UPI शी लिंक करावा लागेल. UPI पेमेंटची पडताळणी ही पीपीआय क्रेडिंशियलसह केली जाईल. त्यामुळे यूपीआय व्यव्हारांना मान्यता दिली जाईल.

PPI म्हणजे काय?

PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स. यात फोनपे, पेटीएम आणि गुगलपेचा समावेश आहे. पीपीआय जारीकर्त्याने ग्राहकाचा पीपीआय हा यूपीआय हँडलशी जोडला पाहिजे. यामुळे तुम्हाला यूपीआय पेमेंट करता येईल.त्यामुळे तुम्ही KYC केल्यानंतर कोणत्याही अॅपवरुन पेमेंट करु शकतात. म्हणजेच जर कुम्हाला गुगल पेवरुन पेमेंट करायचे असेल तर तुम्ही फोन पे वॉलेट वापरुन थेट गुगल पे अॅपद्वारे पेमेंट करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT