आता सर्वत्र नागरिक ऑनलाईन व्यवहार करताना पाहायला मिळतात. पेटीएम अॅपमुळे अनेक नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्याचे सोयीस्कर झाले होते. पण RBI बँकने पेटीएम कंपनीला नियमांचे पालन न केल्यामुळे बंदी घातली होती. यामुळे पेटीएम कंपनीला नवीन यूजर्स जोडण्याची परवानगी नव्हती. यानंतर पेटीएम कंपनीने NPCI कडे नवीन यूजर्स जोडण्याची परवानगी मागितली होती.
नागरिकांसाठी पेटीएम कंपनी नेहमी पेमेंटची सुलभ सेवा पुरवत असते. सध्या या फिनटेक फर्म पेटीएमने NPCI ला ऑगस्ट महिन्यात नवीन यूजर्सची मागणी केली होती. पण NPCI ने त्यांची ही मागणी २२ ऑक्टोबर रोजी मान्य केली होती. यामुळे NPCI ने फिनटेक फर्म पेटीएमला नवीन यूजर्स जोडण्याची परवानगी दिली आहे. पेटीएम कंपनीने सांगितले आहे की, सगळ्या परिपत्रकांचे पालन केल्यानंतर कंपनीला ही मंजुरी मिळाली आहे. NPCI ने त्यांच्या मंजूरी पत्रात पेटीएम कंपनीला सर्व नियमांचे पालन करण्याचे सांगितले होते. पेटीएम कंपनीने नियमांचे पालन केल्यामुळे त्यांना ही नवीन यूजर्स जोडण्याची मंजुरी मिळाली आहे.
पेटीएमचे निकाल जाहीर
नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या फिनटेक फर्म पेटीएमने त्यांचे काही आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. पेटीएम कंपनीने २०२४-२०२५ च्या आर्थिक वर्षात जोरदार नफा कमावला आहे. याबरोबर कंपनीने सप्टेंबर महिन्यात ९२८.३ कोटी रुपयांनी पैसे कमवले आहे. तर पेटीएम कंपनीच्या किंमतीत ८३८.९ कोटी रुपयांनी घसरण झाली आहे. फिनटेक फर्म पेटीएम कंपनीने त्यांच्या सेवेमध्ये ऑनलाईन फूड डिलेव्हरी Zomato फ्लॅटफॅार्म साईटला मनोरंजन तिकिटे दिली होती. Zomato फूड डिलव्हरी फ्लॅटफॅार्मच्या साहाय्याने पेटीएम कंपनीने ही मनोरंजक तिकिटे विकल्यामुळे त्यांना १,३४५.४ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. पण सध्या सप्टेंबर महिन्यात फिनटेक फर्म पेटीएमचे शेअर खराब झाले आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स ५.७८ टक्क्यांनी घसरले असून, ६८४ रुपयांवर बंद झाले आहे. फिनटेक फर्म पेटीएमचे संपूर्ण भांडवल ४३७७० कोटी रुपये आहे.