नोकरी करून कंटाळला असाल आणि स्वतःचा पण कमी पैशात व्यवसाय सुरु करण्याता विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बिझनेस म्हटलं की, त्यासाठी गुंतवणूक ही आलीच. यासाठी लागणाऱ्या जास्त पैशांमुळे अनेकजण बिझनेस करण्याचा विचार सोडून देतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत, जो तुम्ही अवघ्या ५० हजारांपासून सुरु करू शकता.
आज आम्ही तुम्हाला एका उत्तम बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत. तुम्ही फक्त 50 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. इतकंच नाही तर कोटींमध्ये पैसे कमवू शकता. आम्ही ऑनलाइन होर्डिंग बिझनेसबद्दल बोलतोय. डिजिटल युगात ऑनलाइन होर्डिंग व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.
ॲडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी GoHoardings.com च्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा यांनी एक न्यूज वेबसाईटशी चर्चा केली. यावेळी दीप्ती या बिझनेसमधून दर महिन्याला 1 कोटींहून अधिक कमाई करत असल्याचं समोर आलं. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय कसा सुरू करू शकता आणि त्यातून तुम्ही किती कमाई करू शकता हे जाणून घेऊया.
दीप्ती अवस्थी शर्मा यांनी 2016 मध्ये जेव्हा ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्या 27 वर्षांच्या होत्या. त्यावेळी फारसे पैसे नसल्यामुळे दीप्ती यांनी केवळ ५० हजार रुपये गुंतवून ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय सुरु केला होता.
यानंतर पुढच्याच वर्षीपासून 12 कोटी रुपयांची कमाई सुरू झाली आणि वर्षभरानंतर दीप्ती यांच्या कंपनीची उलाढाल 20 कोटींहून अधिक झाली. दीप्ती यांच्या सांगण्यांनुसार, त्यांनी 2016 मध्ये 50 हजार रुपयांच्या अगदी कमी पैशातून डिजिटल होर्डिंगचा बिझनेस सुरू केला. ही कल्पना यशस्वी झाली.
मार्केटिंग आणि विविध नवीन टेक्निक्सच्या मदतीने तुम्ही या कामाला सुरुवात करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या डोमेन नावाने वेबसाइट तयार करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या या वेबसाईटचं प्रमोशन करण्याची आवश्यकता असणार आहे. सुरुवातीला तुम्ही जाहिरात करण्यासाठी लोक कुठे आणि कसे जागा शोधतायत याची माहिती घ्या. यानंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हा व्यवसाय कमी वेळात प्रगती करतो. याचं कारण म्हणजे रोज लोकांना घरी बसून एड करायची असते.
यासाठी कस्टमरला GoHoardings.com च्या वेबसाइटवर लॉग इन करावं लागणार आहे. यानंतर, तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचं लोकेशन शोधून (जिथे होर्डिंग लावायचंय तिथे ) ते निवडायचं आहे. एकदा हे स्थान निश्चित झाल्यानंतर कंपनीला एक मेल पाठवण्यात येतो. यानंतर साईट आणि लोकेशनया उपलब्धतेचं कन्फर्मेशन कंपनीद्वारे पाठवण्यात येतं. लोकेशन साइटवर लाइव्ह जाण्यासाठी आयडी आणि पासवर्ड दिला जातो. ही कंपनी एका महिन्याच्या कालावधीसाठी होर्डिंग लावण्यासाठी अंदाजे 1 लाख रुपये आकारते. त्यामुळे तुम्ही बरीच मोठी कमाई करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.