UPI New Rules Saam Tv
बिझनेस

UPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार परिणाम

UPI New Rules for Google Pay, Phone Pay and Paytm: यूपीआयच्या नियमात महत्त्वाचे बदल झाले आहे. यामुळे ऑनलाइन पेमेंट अधिक सोपे आणि जलद होणार आहे.

Siddhi Hande

UPI च्या नियमात बदल

गुगल पे, फोन पे आणि पेटीएमवर होणार परिणाम

डिजिटल व्यव्हार अधिक जलद आणि सुरक्षित होणार

सध्या सर्वकाही डिजिट झाले आहे. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत. यूपीआयद्वारे अनेकजण पेमेंट करतात. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमात महत्त्वाचे बदल झाले आहे. फेब्रुवारी २०२६ पासून हे नवीन नियम लागू झाले आहे. याचा परिणाम थेट गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार आहे. हे नवीन नियम डिजिटल ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित होण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

यूपीआय ट्रान्झॅक्शन होणार जलद

यूपीआयत्या नवीन नियमानुसार यूपीआय ट्रान्झॅक्शन अधिक जलद गतीने होणार आहे.API रिस्पॉन्स जास्तीत जास्त १० सेकंदात पेमेंटचे काम करणार आहे. याआधी प्रोसेसला ३० सेकंदाचा वेळ लागायचा. आता हा बदल करण्यात आला आहे.

API म्हणजे अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ही एक डिजिटल सिस्टीम आहे. याद्वारे तुम्ही यूपीआयवरुन बँक बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत बँकेला पैसे पाठवल्यावर मेसेज येणार आहे.

वाढत्या डिजिटल पेमेंटला सपोर्ट

आता यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे रियल टाइम प्रोसेसिंग अधिकच मजबूत करणे गरजेचे आहे. आता नवीन नियमानुसार गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवर ट्रान्झॅक्शन करतानाच्या समस्या कमी होतील.

सुरक्षित पेमेंट

नवीन यूपीआय नियमांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. हाय वॅल्यु ट्रान्झॅक्शनसाठी व्हेरिफिकेशन होईल. तसेच सबस्क्रिप्शन किंवा ऑटो डेबिट रिकरिंट पेमेंट मॅनेज किंवा रद्द करणे सोपे होणार आहे.

निष्क्रिय UPI ID साठी व्हेरिफिकेशन

जो यूपीआय आयडी बऱ्याच दिवसापासून वापरला नाही त्यावरुन पेमेंट किंवा त्या अकाउंटला पेमेंट करणे रोखणार आहे. पेमेंट करण्यासाठी युजर्सला री व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू, तरी लोणावळ्यात ५ ते १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; कारण काय?

Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Viral Video: ५ दिवस घरात पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन, दुचाकीवरून थेट कार्यलयात, पाहा व्हिडिओ

Trendy Hairstyles: ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 झटपट आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT