निवडणुकीत वाटले नोटांचे खोके? 'शिंदेसेना शाखाप्रमुखाला 50 लाखांच्या नोटांचा खोका; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ

Shinde Sena Branch Chief Allegedly: मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाला ५० लाखांचा खोका देण्यात आलाय. कोण आहे हा शाखाप्रमुख? का आणि कुणी दिलेत पैसे? कुणी बाहेर काढला हा खोक्याचा धक्कादायक व्हि़डिओ? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
50 LAKH CASH BOX VIDEO VIRAL
50 LAKH CASH BOX VIDEO VIRALsaam tv
Published On: 

राज्यात पक्ष फोडाफोडीनंतर समोर आलेला खोक्याचा मुद्दा थेट महापालिका निवडणुकांपर्यंत येऊन पोहचलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचा शाखाप्रमुख असलेल्या उमेदवाराच्या पतीला थेट पन्नास लाखांच्या नोटांचा खोका गिफ्ट म्हणून पाठवण्यात आल्याचा व्हि़डिओ व्हायरल झालाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. हा व्हिडीओ तुम्हीच एकदा पाहा...

मनसे नेते संदीप देशपांडे फक्त व्हिडिओ पोस्ट करून थांबले नाहीत. त्यांनी या नोटांच्या खोक्यांचा व्हिडिओची सत्यता आणि त्यातील दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीये... तर दुसरीकडे, संदीप देशपांडेंकडेच असे व्हिडीओ कुठून येतात, याची चौकशी केली पाहिजे, असं सांगत शिंदसेनेनं पलटवार केलाय...

शिंदेसेनेचा शाखाप्रमुखच या खोक्यांचा व्हिडिओमध्ये दिसत असल्यामुळे ठाकरेसेनेला आयतं कोलीत मिळालंय. याप्रकरणी चौकशी करून सुमोटो दाखल करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केलीये. तर भाजपनं मात्र ठाकरेसेनेवर गंभीर आरोप केलेत...

महत्त्वाचं म्हणजे, संदीप देशपांडेंनी आरोप केलेले संतोष पवार हे शिंदेसेनेचे कुलाब्यातील शाखा प्रमुख आहेत. त्यामुळे ज्या कुलाबा प्रभागावरून हे आरोप सुरू झालेत... ते प्रकरण नेमकं आहे तरी काय? ते पाहूयात...

काय आहे प्रकरण?

मुंबईतील प्रभाग 226 मध्ये मकरंद नार्वेकर आणि तेजल पवार लढत

अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना ठाकरेसेनेचा पाठिंबा होता

मकरंद नार्वेकरांना 18,058 तर तेजल पवारांना 7,797 मतं

मकरंद नार्वेकर यांचा 10,061 मताधिक्यानं दणदणीत विजय

अर्ज मागे घेण्यासाठी तेजल पवारांवर दबाव असल्याचा ठाकरेसेनेचा आरोप

महत्त्वाचं म्हणजे, बीएमसी निवडणुका होऊन सुमारे 10 महिने उलटून गेलेत. मात्र, या निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला का, असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे, संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील संतोष पवार यांच्या संवाद साधला असता ते नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय. मात्र, निवडणुकीवेळी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप तेजल पवारांनी केल्याचंही देशपांडेंनी सांगितलंय... त्यामुळे शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संतोष पवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी नोटांचा खोका देणारा नेता कोण?...याची चौकशी होणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.