

प्रत्येक नोकरदार वर्गाला त्याचा पीएफ असतो. जो त्याला हवा असेल तेव्हा तो काढू शकतो. बऱ्याचदा पीएफ हा सेविंग्स म्हणून तुम्ही वापरु शकता. जेव्हा तुम्हाला याची खूप गरज असते, जसे की, नोकरी बदलताना, आजारपणात, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही यातली रक्कम काढू शकता. पण अशावेळेस तुम्हाला रातोरात पीएफ काढता येत नाही. कारण यात काही प्रक्रिया फॉलो कराव्या लागतात. हेच टेंन्शन आता कमी झालं आहे. कसं? हे जाणून घेण्यासाठी पुढील बातमी सविस्तर वाचा.
PF काढताना आधी फॉर्म भरावे लागायचे, कागदपत्रांची तपासणी व्हायची आणि मग पैसे ठराविक दिवस वाट पैसे मिळायचे. आता हीच प्रक्रिया बदलण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटना करत आहे. ईपीएफओ लवकरच अशी नवी सुविधा सुरू करणार आहे.
त्यामुळे पीएफचा पैसे काढणं सोपं होणार आहे. यासाठी यूपीआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी मोबाईलमधून अॅप उघडून पीएफ काढण्याची विनंती करता येईल आणि रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे पीएफ खाताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुढील दोन ते तीन महिन्यांत यूपीआयवर पीएफ काढण्याची व्यवस्था सुरू होऊ शकते. यासाठी ईपीएफओ आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मिळून तांत्रिक तयारी करत आहेत. या नव्या पद्धतीत पीएफ खाताधारक यूपीआय अॅपच्या माध्यमातून पैसे काढण्याची मागणी करू शकतील. त्यानंतर आधार, बँक खाते आणि पीएफ खात्याशी संबंधित माहितीची तपासणी केली जाईल. सर्व तपशील बरोबर असेल तरच क्लेम मंजूर केला जाईल.
सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचा ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम जरी ऑटो मोडमध्ये केला, तरी पैसे मिळण्यासाठी किमान तीन दिवस लागू शकतील. रक्कम जास्त असेल तर ही प्रक्रिया आणखी लांबते. मात्र नव्या यूपीआय प्रणालीमुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
आजारपण, उपचार, मुलांचे शिक्षण किंवा लग्न यांसारख्या मान्य कारणांसाठी क्लेम केल्यास तपासणी झाल्यानंतर रक्कम थेट यूपीआयशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे क्लेम मंजूर होताच पैसे जवळपास करंट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास पुढील काळात पेटीएम, फोनपे आणि गुगल पे यांसारख्या इतर यूपीआय अॅप्सवरही ही सुविधा सुरू केली जाऊ शकते. याने कर्मचाऱ्यांना मोठा आनंद होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.