

आजकालच्या नव्या लाइफस्टाइलमध्ये लोक व्यसन हे फॅशन म्हणून करतात. पण याच घाणेरड्या सवयीमुळे तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो. कारण सध्या पुर्वीच्या लोकांसारख्या सवयी किंवा नेहमीचं रुटीन कोणी फॉलो करत नाही. आधी लोक सकाळी उठून व्यायाम करायचे, पौष्टीक आहार घ्यायचे आणि खूप मेहनतीचं काम करायचे पण आत्ता ही लाइफस्टाइल नसल्यामुळे अनेकांना कमी वयातच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
कॅन्सर हा सध्याच्या काळातला एक गंभीर आजार आहे. कारण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू या आजाराने होत आहे. काही वेळेस हेल्दी लाइफस्टाइल स्वीकारली तरी कर्करोगाचा धोका पूर्णपणे टाळता येईलच असं नाही. त्यामुळे कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी स्क्रिनिंग चाचण्या खूप महत्त्वाच्या करणं गरजेचं आहे. या चाचण्यांच्या मदतीने लक्षणं दिसण्यापूर्वीच कॅन्सर ओळखायला मदत होते. त्यामुळे उपचार सोपे होतात आणि बरं होण्याची शक्यता वाढते.
ब्रेस्ट कॅन्सर ओळखण्यासाठी मॅमोग्राफी ही एक्स-रे चाचणी केली जाते. जोखमेच्या पातळीवर अवलंबून महिलांनी साधारणपणे वयाच्या ५०साव्या वर्षानंतर ही तपासणी सुरू केली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) ओळखण्यासाठी पॅप स्मिअर आणि HPV चाचण्या महत्त्वाच्या मानल्या जातात. बहुतेक महिलांनी वयाच्या २१व्या वर्षापासून ते ६५ वर्षांपर्यंत नियमित तपासणी करणे गरजेचं असतं.
आंत्र कर्करोगासाठी (Bowel Cancer) कोलोनोस्कोपी ही प्रमुख तपासणी असून साधारणपणे वयाच्या ४५व्या वर्षापासून ७५ वर्षांपर्यंत ही चाचणी केली जाते. फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कमी डोस CT स्कॅनचा वापर केला जातो. विशेषतः ५० ते ८० वयोगटात काही विशिष्ट कॅन्सरसाठी जोखमीच्या गटातील्या लोकांना इतर तपासण्या सुद्धा सुचवल्या जातात. योग्य वेळी तपासणी केल्यावर कर्करोगावर मात करणं शक्य होतं आणि तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.