BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Blood Pressure Tips: हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या ४ सोप्या सवयी नियमित फॉलो करा. योग्य श्वसन, पाणी पिणं आणि हेल्दी लाइफस्टाइलने हृदय निरोगी ठेवा.
bp control tips
BP tablets morning or nightgoogle
Published On

सध्या सगळ्यांच्याच लाइफस्टाइलमध्ये मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जाणं, फिरणं, खाणं या सवयी आल्या आहेत. अर्थातच याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामध्ये अनेकांमध्ये वाढलेली समस्या म्हणजे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure). याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाहीतर तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागेल.

ब्लड प्रेशर नियंत्रणात आहे की नाही? हे रोजच्या रोज पाहणं योग्य आणि गरजेचं असतं. याने तुम्हाला तुमच्या हालचालींचा एक अंदाज बांधता येतो. तुम्ही त्यानुसार तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करू शकता. मुळात रक्तदाब तेव्हाच वाढतो जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांवर रक्ताचा परिणाम जास्त होतो. यावर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुढील काही सोप्या सवयी तुम्हाला एकदम हेल्दी ठेवतील.

bp control tips
SS Rajamouli : एसएस राजामौली यांच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, ssmb29 शूटिंग सुरू, वाचा अपडेट

श्वासासंबंधीत व्यायाम करणे

रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही रोज श्वलनासंबंधीत व्यायाम करावेत. जेव्हा तुम्ही खोल हळूहळू श्वास घेता तेव्हा तुमच्या पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था अॅक्टीव्ह होतात. याने तुमच्या ह्रदयाचे ठोके लेव्हलमध्ये एकसारखे होतात. यासाठी तुम्ही एका शांत ठिकाणी बसा. मग व्यायामाला सुरुवात करा. ५ ते १० मिनिटांची ही सवय तुमचं आयुष्य चांगल्याप्रकारे सुधारु शकते.

थंड पाण्याचा वापर

ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी जमल्यास थंड पाण्याने अंघोळ करावी. रोजच्या रोज करणं शक्य नसेल तरी चालेल. तुम्ही फ्रेश होताना ही पद्धत वापरु शकता. याने रक्तदाब कमी होतो. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर, डोक्यावर हे पाणी पडतं तेव्हा शरीरातल्या रक्त वाहिन्या आकुंतन पावतात. याने मच्या हृदयाकडे परतणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे तुमच्या धमन्यांमधील दाब कमी होतो.

लिंबू पाण्याचे सेवन

लिंबू पाणी साखर मीठ न घालता तयार करुन रोज १ ग्लास पित राहा. याने रक्तदाब कमी होतो. कारण यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. त्याने तुमच्या शरीरातल्या सोडियमची पातळी संतुलित करण्यास आणि रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते. याच निमित्ताने तुमच्या शरीरात पाण्याचे सेवन जास्त होते.

bp control tips
Vitamins: सावधान! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

पाणी सतत पित राहा.

डिहायड्रेशनमुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. कारण तुमच्या पाणी न प्यायल्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होतं. जेव्हा रक्ताचं प्रमाण कमी असतं तेव्हा ह्रदयावर ताण येतो आणि तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक राहतात. तुम्हाला अचानक चक्कर येत असेल तर हळूहळू १ ग्लास पाणी पित राहा. याने तुम्हाला शौचालयाला लागेल आणि रक्तदाब कमी होईल.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

bp control tips
Blouse Designs: डोरी-बॅकलेस झाले जुने! सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे 7 स्टायलिश ब्लाउज डिझाईन्स, यात तुम्हीच दिसाल उठून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com