

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांना खूप कमी वयातच व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवते. यासाठी लोक अनेक प्रकारच्या गोळ्या घेतात. पण तुम्हाला हा प्रश्न पडलाय का? की, या गोळ्यांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? त्या किती प्रमाणात आपण घेतल्या पाहिजेत. चला पुढे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे फायदे, तोटे आणि मर्यादा जाणून घेऊयात.
प्रत्येकालाच निरोगी राहायचं असतं. त्यामुळे लोक लगेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या गोळ्या घेतात. या गोळ्या सर्रास कोणत्याही मेडीकलमध्ये मिळतात. पण याचं सेवन किती करावं? याचा लोक विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक घातक आजारांना बळी पडावं लागतं.
तज्ज्ञांच्या मते, शरीराला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज आहे, हे सांगण्यासाठी RDA आणि AI या कॉनसेप्ट वापरल्या जातात. वय, लिंग आणि आरोग्याची स्थिती या नुसार गरजा बदलू शकतात. याशिवाय UL म्हणजेच कमाल सुरक्षित मर्यादा खूप महत्त्वाची मानली जाते. ही मर्यादा ओलांडल्यास साइड इफेक्ट्स किंवा ओव्हरडोसचा धोका वाढतो.
अनेक सप्लिमेंट्सच्या पॅकवर Daily Value दिलेली असते. ही किंमत RDAच्या आसपास असते, पण काही सप्लिमेंट्समध्ये हे प्रमाण खूप जास्तही असतं. काही लोकांना जास्त प्रमाणात सेवन करूनही त्रास होत नाही, तर काहींना थोड्याशा जास्त डोसमुळेही त्रास होतो. त्यामुळे UL ही मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सर्व मर्यादा एकूण सेवनासाठी असतात. म्हणजेच अन्नातून मिळणारे आणि सप्लिमेंटमधून मिळणारे दोन्ही प्रमाण एकत्र असणं यात गरजेचं असतं. जर एखाद्या जेवनाच्या पदार्थातून व्हिटॅमिन किंवा मिनरल अन्नातूनच भरपूर मिळत असेल, तर सप्लिमेंट घेताना त्याचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे.
जर तुम्ही बी-व्हिटॅमिन गोळी घेत असाल तर या गोळीतल्या कोलीनचे प्रमाण दिवसाला 3,500 मिलीग्रॅम आहे. कॉपरसाठी रोजची गरज कमी असली तरी 10,000 मायक्रोग्रॅमपर्यंत सेवन सुरक्षित मानलं जातं. फ्लुराइडचं प्रमाण महिलांसाठी 3 मिलीग्रॅम आणि पुरुषांसाठी 4 मिलीग्रॅम असावं, मात्र दोघांसाठीही कमाल मर्यादा 10 मिलीग्रॅम इतकीच आहे.
फॉलिक अॅसिडबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक अन्नातून मिळणारं फोलेट सुरक्षित असतं, पण सप्लिमेंट्समध्ये सिंथेटिक फॉलिक अॅसिड दिवसाला 1,000 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त घेणं टाळावं. आयोडीनची रोजची गरज 150 मायक्रोग्रॅम असते. 1,100 मायक्रोग्रॅमपर्यंत सेवन हे सुरक्षित मानलं जातं.
लोह म्हणजेच आयर्नचे प्रमाण कमी किंवा जास्त झालं तरी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 19 ते 50 वयोगटातल्या महिलांना दिवसाला 18 मिलीग्रॅम आयर्नची गरज असतं. तर पुरुष आणि ज्येष्ठ महिलांसाठी 8 मिलीग्रॅम पुरेसं असतं. मात्र आयर्नचे सुरक्षित प्रमाण 45 मिलीग्रॅम इतकंच आहे.
एकूणच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आरोग्यासाठी आवश्यक असलं तरी त्यांचे जास्त सेवन टाळणं तितकंच महत्त्वाचे आहे. कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या आहारातून किती पोषक घटक मिळतात याचा अंदाज घ्या. याने तुम्ही हेल्दी लाइफ जगू शकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.