Sakshi Sunil Jadhav
कमळ हे फक्त भारताचंच नव्हे, तर जगातील अनेक देशांचं राष्ट्रीय फूल आहे. सौंदर्य, शुद्धता आणि आध्यात्माचं प्रतीक या फुलाला मानलं जातं. पाहूया कोणकोणत्या देशांनी कमळाला राष्ट्रीय फूलाचा मान दिला आहे.
भारतामध्ये कमळ राष्ट्रीय फूल आहे. चिखलातून उगम पावूनही कमळ पवित्र आणि सुंदर राहते. ते सत्य, ज्ञान आणि आध्यात्माचं प्रतीक मानलं जातं. देवी लक्ष्मीचं आसनही कमळ आहे.
व्हिएतनाममध्येही कमळ (Lotus) हे राष्ट्रीय फूल आहे. तिथे कमळ सौंदर्य, शुद्धता आणि दृढतेचं प्रतीक मानलं जातं. व्हिएतनामी संस्कृती आणि कलेत कमळाचं मोठं स्थान आहे.
प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीत आढळणारा निळा कमळ राष्ट्रीय फूल मानला जात होता. तो सूर्यदेव आणि पुनर्जन्माचं प्रतीक होता. आजही इजिप्तच्या प्राचीन कलेत कमळ दिसून येतं.
श्रीलंकेचा राष्ट्रीय फूल निळं कमळ आहे. बौद्ध धर्मात कमळ शुद्धता आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. भगवान बुद्धांना अनेकदा कमळावर बसलेलं दर्शवलं जातं.
बांगलादेशचे राष्ट्रीय फूल ‘शापला’ (Water Lily) आहे, जो कमळ कुटुंबातीलच आहे. नद्या आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा फूल सौंदर्याचं प्रतीक आहे.
मालदीवचा राष्ट्रीय फूल पिंक लोटस आहे. तलाव आणि चिखलामध्ये उमलणारे हे फूल शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक मानला जातो.
चिखलात जन्म घेऊनही कमळ स्वच्छ, सुंदर आणि सुगंधी राहतं. म्हणूनच ते संघर्षातून वर येण्याचं प्रतीक मानलं जातं.
कमळ आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वतःची शुद्धता आणि सौंदर्य टिकवून ठेवता येतं. म्हणूनच अनेक देशांनी कमळाला राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारलं आहे.