Sakshi Sunil Jadhav
बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या समस्या वाढतात. याचा थेट परिणाम तुमच्या लिव्हरवर होतो.
डॉक्टरांच्या मते तुम्ही घरच्या घरीच यावर काही उपाय केले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काही ड्रायफ्रूट्सचा रोजच्या आहारात सेवन केले पाहिजे.
ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स, हेल्दी फॅट्स आणि अंटीऑक्सिडेंट्स असतात. जे लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहेत.
लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी तुम्हाला काही सुकेमेवे उपयोगी ठरतील. त्यांचं योग्य प्रमाणात सेवन काही दिवसात तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळवून देईल.
अक्रोडामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि अॅंटीऑक्सिडंट्स असतात. जे लिवरमधला फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
बदामात व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त असते. याने लिव्हर सेल्सला कोणतीच हानी होत नाही आणि लिव्हरच्या समस्या दूर होतात.
मणूक्यांमध्ये असणारी नैसर्गिक साखर आणि फायबर्स तुमचं पचन सुधारतात. म्हणजेच लिव्हरवर येणारा दाब कमी होतो आणि शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात.
काजू खाल्याने लिव्हरला मदत होते. तसेच त्याच्यामध्ये असणारे फॅट्स आणि मिनरल्स मेटाबॉलिजम वाढवायला मदत करतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.