Relationship: अचानक कोणासाठी तरी खास झालात? लव्ह बॉम्बिंग रिलेशन नाही ना? वाचा प्रेमाचा हा नवा ट्रेंड

Sakshi Sunil Jadhav

लव्ह बॉम्बिंग म्हणजे?

लव्ह बॉम्बिंग ही एक मानसिक आणि भावनिक रणनीती आहे. यात एखादी व्यक्ती काही काळात अतोनात प्रेम, लक्ष आणि आपुलकी दाखवून तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून राहायला शिकवते.

Relationship Tips

सुरुवात कशी असते?

सतत कौतुक होतं, 'तूच माझं सर्वस्व आहेस' असे शब्द आणि तुमची काळजी घेतल्याने हा टप्पा फारच सुरक्षित आणि सुखाचा वाटतो.

Relationship Tips

भावनिक संरक्षण

या मध्ये एकमेकांवर असलेल्या जास्त प्रेमामुळे तुमची भीती किंवा त्या व्यक्तीबाबत शंका कमी होतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवला जातो.

Relationship Tips | Saam TV

तुमच्या अपेक्षा वाढतात

या रिलेशनमध्ये प्रत्येक वेळेस समोरची व्यक्ती संपर्कात हवी अशी अपेक्षा असते. दिवसभरातली विचारपूस, तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा लव्ह बॉम्बिंगचा दुसरा टप्पा असतो.

Relationship Tips | pexel

गॅसलाइटिंगचा धोका

कधी कधी समोरची व्यक्ती तुम्हालाच संशयात टाकते, तुमच्या भावना चुकीच्या आहेत असं वाटायला लावतं. यामुळे तुम्ही खचून जाता.

signs of love bombing | Canva

सीमा ठरवल्यावर होणारा परिणाम?

तुम्ही मर्यादा ठेवण्याचा प्रयत्न केला की समोरची व्यक्ती स्वतःला बळी ठरवते. त्याने तुम्हाला अपराधीपणा जाणवतो किंवा नातं सोडण्याची धमकी दिली जाते.

Relationship Tips | SAAM TV

प्रेम आणि लव्ह

खरं प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि आदर देतं. लव्ह बॉम्बिंगमध्ये मात्र तुमच्या नाहीला किंमत नसते. हा यातला फरक आहे.

Relationship Tips

लव्ह बॉम्बिंगची लक्षणं

गरजेपेक्षा महागडे गिफ्ट्स, जास्त काळजी, वेळेची मागणी, तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणं ही सगळी धोक्याची चिन्हं आहेत. त्यामुळे जोडीदार निवडताना तुम्ही सगळ्या बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे.

Grow love | google

NEXT : महाराष्ट्रातलं Switzerland! थंडीत नक्की भेट द्या मुंबई-पुण्याजवळच्या 'या' मिनी स्वित्झर्लंडला

Mahabaleshwar Panchgani Winter Tourism
येथे क्लिक करा