Sakshi Sunil Jadhav
परदेशवारीचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वित्झर्लंडला जाणं महाग वाटत असेल, तर महाराष्ट्रातच एक असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला अगदी तसाच अनुभव मिळू शकतो.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध आहे. याला मिनी स्वित्झर्लंड असंही म्हटलं जातं.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ महाबळेश्वरसाठी सर्वोत्तम मानला जातो. थंड हवा, धुकं आणि हिरव्यागार डोंगररांगा मन मोहून टाकतात.
वेण्णा लेक, आर्थर सीट, विल्सन पॉइंट, एल्फिन्स्टन पॉइंट, मॅप्रो गार्डन ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. बोटिंग आणि सूर्यास्ताचा अनुभव खास ठरेल.
महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किमी अंतरावर असलेलं पंचगणी हे दुसरं सुंदर ठिकाण आहे. टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि विस्तीर्ण हिरवळ इथली ओळख आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे मग पुणे - सातारा बायपास - वाई - पंचगणी - महाबळेश्वर असा मार्ग आहे. अंतर सुमारे 260 ते 270 किमी आहे.
एमएसआरटीसीच्या शिवशाही बस तसेच खासगी बसेस उपलब्ध आहेत. दादर, बोरिवली, शीव येथून बस सुटतात. 6 ते 8 तास लागतात.
पुणे - NH48 - सातारा बायपास - वाई - पंचगणी - महाबळेश्वर असा मार्ग आहे. यात अंतर 120 ते 130 किमी आहे. 3 ते 4 तासांचा प्रवासात लागतात. स्वारगेट व शिवाजीनगर येथून शिवशाही व खासगी बसेस उपलब्ध आहेत. तिकीटाचे दर साधारण 450 ते 1000 रुपयांपर्यंत असतात.