Sakshi Sunil Jadhav
साडी कितीही सुंदर असली तरी ब्लाउजचा डिझाईन चुकीचा असेल, तर संपूर्ण लुक फिकाच वाटतो. खासकरून ज्या महिला रोज साडी नेसतात त्यांना थंडीत फुल स्लीव्ह्स किंवा थ्री-फोर्थ स्लीव्ह्स ब्लाउजमध्ये नव्या डिझाईन्स हव्या असतात. चला जाणून घेऊयात.
डोरी-बॅकलेसऐवजी नवे, ट्रेंडी ब्लाउज डिझाईन्स फॅशनमध्ये आले आहेत. आता बॅक साईडला कटवर्क, बो शेप किंवा व्ही-नेक डिझाईन ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाईन फुल स्लीव्ह्ससोबत परफेक्ट दिसतात.
स्वीटहार्ट नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्स असलेला ब्लाउज खूपच एलिगंट दिसतो. हेवी साडीवर साधा ब्लाउज आणि साध्या साडीवर लेस वर्क असलेली नेकलाइन तुमची सुंदरता वाढवते.
साध्या डोरीऐवजी आता बो शेप किंवा फॅन्सी टाय-अप डिझाईन लोकप्रिय होत आहेत. मागील बाजू फॅन्सी असेल तर संपूर्ण साडी लुक सगळ्यात आकर्षक दिसतो.
ब्लाउजच्या नेकलाइनवर फ्रिल्ड लेस लावल्याने व्हिंटेज आणि क्लासी लुक मिळतो. प्रिंटेड किंवा सिंपल ब्लाउजसाठी हा प्रयोग खास ठरतो.
ब्लाउजच्या बॅक साईडला कटवर्क डिझाईन फारच स्टायलिश दिसते. कॉटन आणि सिल्क साड्यांसोबत हा डिझाईन विशेष उठून दिसतो. blouse fashion 2026
पफ स्लीव्ह्स पुन्हा एकदा फॅशनमध्ये परतला आहे. व्हिंटेज टच देणारा हा ब्लाउज साध्या साडीला रॉयल लुक देतो.
चोळी कट ब्लाउज सध्या तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. फुल स्लीव्ह्ससोबत हा डिझाईन खूपच ट्रेंडी आणि मॉडर्न लुक देतो.
डोरीऐवजी व्ही नेकलाइन असलेली बॅक डिझाईन सिल्क साड्यांसोबत फारच फॅन्सी दिसते. पार्टी किंवा लग्नासाठी हा ब्लाउज उत्तम पर्याय ठरतो.