

घरगुती जेवणात तोंडी लावायला एखादा झणझणीत पदार्थ असेल, तर जेवणाची मजाच वेगळी होते. हिरव्या मिरच्यांचा ठेचा सर्वांच्याच आवडीचा असतो. पण ओल्या लाल मिरच्यांपासून बनवलेला ठेचा चवीला झणझणीत आणि टिकाऊ असतो. खास बाब म्हणजे योग्य पद्धतीने केला तर हा ठेचा तब्बल महिनाभर खराब न होता राहतो. पुढे आपण याची रेसिपी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत.
ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा हा फक्त भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठीच नाही, तर भाजी, आमटी, वरण किंवा उसळीत मसाल्याऐवजी घालण्यासाठीही वापरता येतो. यामुळे पदार्थाची चव जास्त खुलते आणि वेगळा झणझणीतपणा येतो. सध्या अनेक गृहिणी रेडीमेड मसाल्यांपेक्षा घरच्या घरी केलेल्या ठेच्याला जास्त पसंती देतात, कारण यामध्ये कोणतेही कृत्रिम घटक नसतात.
हा ठेचा बनवण्यासाठी ओल्या लाल मिरच्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या करून घेतल्या जातात. त्यानंतर मिरच्या, लसूण, आलं, लिंबाचा रस आणि मीठ हे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करु घ्यायचं असतं. पाणी न घालता वाटल्याने ठेचा जास्त दिवस टिकतो. तयार ठेचा एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. त्याने त्याची चव आणि रंग दोन्ही कायम राहतात.
खाण्याच्या वेळी हा ठेचा थेट तोंडी लावायला घेता येतो किंवा थोडासा ठेचा वाटीत काढून त्यावर तेल, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली तरी चव जास्त वाढते. विशेष म्हणजे हा ठेचा फक्त तिखटपणासाठी नाही, तर लसूण आणि लिंबामुळे पचनासाठीही उपयुक्त मानला जातो. त्यामुळेच रोजच्या जेवणात थोडासा लाल मिरचीचा ठेचा असेल, तर साधे जेवणही खास वाटू लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.