Sakshi Sunil Jadhav
तुम्ही विकेंडला २ दिवस कुठेतरी नव्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करताय? मग पुढची माहिती जाणून घ्या.
बदामी हे ठिकाण पाहलं नसेल तर तुम्ही या विकेंडला नक्की जा. हे कमी बजेटमध्ये फिरता येणारं ठिकाण आहे. चला पुढे याचा संपूर्ण प्लान जाणून घेऊयात.
तुम्हाला बदामीला जायचं असेल तर रोज रात्री तुम्हाला पुणे किंवा मुंबईहून हॉस्पेट एक्सप्रेस असेल. सकाळी ९ वाजता तुम्ही बदामी स्टेशनला पोहोचाल.
बदामी हे चालुक्य साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाते. लाल दगडांमध्ये कोरलेले शिलालेख तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. तसेच हे ठिकाण खूप शांत असते.
बदामीत एकूण चार लेण्यांची मंदिरे आहेत. शैव लेणी, वैष्णव लेणी, महाविष्णू लेणी, जैन लेणी या लेण्यांमधील कोरीव काम, देवतांच्या मूर्ती तुम्ही याठिकाणी पाहू शकता.
बदामीचा किल्ला हा डोंगरावर वसलेला आहे. इथे तुम्हाला दगडाच्या भिंती, बुरुज, प्राचीन शिवालेख आणि पाण्याचे साठे पाहायला मिळतील. Archaeological Museum मध्ये चालुक्य काळातील मूर्ती, शिलालेख आणि अवशेष पाहू शकता.
अगस्त्य तलावाच्या काठावर वसलेलं भूतनाथ मंदिर आणि मल्लीकार्जून मंदिर हे बदामीचं सौंदर्य जास्त वाढवतं. तलावाभोवती संध्याकाळी फेरफटका मारणं हा खास अनुभव ठरतो. पुढे यल्लमा देवी मंदिर पाहू शकता.
दुसऱ्या दिवशी बनशंकरी मंदिर, हरिद्रातीर्थ पुष्करणी, महाकुटेश्वर मंदिर ही ठिकाणं पाहता येतात. महाकुटेश्वर मंदिर समूह स्थापत्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे.
प्रवासाचा शेवट पट्टदकल आणि ऐहोळे मंदिर समूह दर्शनाने करा. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. अशी एक ट्रीप तुमच्या ज्ञानात भर घालताना दिसते.