Sakshi Sunil Jadhav
आजकाल दैनंदिन व्यवहारांपासून खरेदीपर्यंत UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे पैसे चुकीच्या खात्यात गेल्यावर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
एकदा व्यवहार यशस्वी झाला की कायदेशीरदृष्ट्या ती रक्कम प्राप्तकर्त्याची मानली जाते. बँक किंवा अॅप तुमच्या परवानगीनेही पैसे कापू शकत नाही.
चुकीने गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीची सहमती असणे अत्यावश्यक आहे. त्याने नकार दिल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते.
PhonePe, Google Pay, Paytm किंवा इतर UPI अॅपमध्ये ‘Dispute’ किंवा ‘Wrong Transfer’ हा पर्याय वापरून तक्रार नोंदवा.
तक्रार नोंदवल्यानंतर तुमची बँक प्राप्तकर्त्याच्या बँकेशी संपर्क करते आणि चुकून पैसे गेले असल्याची माहिती देते.
प्राप्तकर्त्याने पैसे परत करण्यास संमती दिल्यास, काही दिवसांत रक्कम तुमच्या खात्यात परत जमा केली जाते.
प्राप्तकर्त्याने पैसे परत देण्यास नकार दिल्यास बँक फारशी मदत करू शकत नाही. अशावेळी पोलिसांत तक्रार करता येते, मात्र पैसे मिळण्याची खात्री नसते.
पेमेंट करण्यापूर्वी UPI ID, प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम नीट तपासणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा व्यवहार पूर्ण झाला की चूक सुधारणे कठीण ठरते.