मळमळ, उलट्या, अतिसाराचा त्रास; शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू, महापालिकेकडून दुकानावर कारवाई

Bhiwandi Food Poisoning: भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर १७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आलीय. बाधितांना मळमळ, उलट्या, अतिसार, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागलाय.
Bhiwandi Food Poisoning: 17 People Fall Ill After Eating Shawarma, Children Affected
Bhiwandi Food Poisoning: 17 People Fall Ill After Eating Shawarma, Children Affected
Published On: 

भिवंडीत शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेत महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश असून, बाधितांना मळमळ, उलट्या, अतिसार, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे,आरोग्य अधिकारी फैसल तातली, आरोग्य पथक आणि निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच अन्न औषधी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले .

दरम्यान विषबाधाच्या या घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली आणि भिवंडी महापालिकेने संबंधित ए.के. शोरमा दुकानावर तोडक कारवाई करत शोरमा टपरी जप्त केलीय. निजामपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून काही नागरिकांनी शोरमा खाल्ला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही रुग्णांना ताप आणि पोटदुखीचाही त्रास जाणवू लागला. सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार ते पाच जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याकडून शोरमा खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. त्याच परिसरातील इतर नागरिकांनीही संबंधित दुकानातून शोरमा खाल्ल्याचे समजल्यानंतर रुग्णालय प्रशासन सतर्क झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.