विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी टीम तयार; राज्य कोअर कमिटीची घोषणा, 'या' नेत्यांकडे आता नवी जबाबदारी!

Himachal Pradesh BJP core committee : हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी समितीची अधिकृत अधिसूचना जारी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार ही समिती गठित करण्यात आलीय.
BJP announces new Himachal Pradesh state core committee for 2027 elections
BJP announces new Himachal Pradesh state core committee for 2027 electionssaam tv
Published On: 
Summary
  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्य कोअर कमिटी जाहीर

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार समिती गठित

  • संघटनात्मक निर्णयांमध्ये कोअर कमिटी महत्त्वाची भूमिका बजावणार

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली राज्य कोअर कमिटी जाहीर केलीय. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. राज्याचे भाजप अध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केलीय.

BJP announces new Himachal Pradesh state core committee for 2027 elections
पक्ष बदलणाऱ्या आमदार-खासदारांना बसणार मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस

राज्य कोअर कमिटीची स्थापना करण्यात आलीय?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीसाठी नावे सुचवण्यात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल. यासह निवडणूक प्रक्रियेतील इतर निर्णयही या समितीच्या संमतीनेच घेतले जातील. जे. पी. नड्डा यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश हे त्यांचे मूळ राज्य आहे. तसेच इतरही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

BJP announces new Himachal Pradesh state core committee for 2027 elections
शरद पवार गट NDAला पाठिंबा देणार की नाही, डिलिमिटेशननंतर राजकीय समीकरणं बदलणार? खासदाराच्या विधानानं चर्चांना उधाण

राज्याच्या कोअर कमिटीमध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (संघटना) सिद्धार्थन, माजी प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुरेश कश्यप, तसेच लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, आमदार व माजी प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंग सत्ती, लोकसभा खासदार डॉ.राजीव भारद्वाज, प्रदेश उपाध्यक्ष व आमदार विपिनसिंग परमार, राज्यसभा सदस्य व प्रदेश सरचिटणीस डॉ. सिकंदर कुमार, प्रदेश सरचिटणीस पायल वैद्य, प्रदेश सरचिटणीस संजीव कटवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.

हे विशेष निमंत्रित सदस्य असतील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्य कोअर कमिटीमध्ये एकूण १२ सदस्य आणि दोन विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजपचे राज्य प्रभारी श्रीकांत शर्मा आणि सह-प्रभारी दर्शना सिंग यांची कोअर कमिटीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.