शरद पवार गट NDAला पाठिंबा देणार की नाही, डिलिमिटेशननंतर राजकीय समीकरणं बदलणार? खासदाराच्या विधानानं चर्चांना उधाण

Sharad Pawar Group NDA Entry Speculation: डिलिमिटेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. शरद पवार गट NDA सोबत जाणार की दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.
Sharad Pawar Faction To Join NDA? Delimitation Debate Sparks Political Buzz
Sharad Pawar Faction To Join NDA? Delimitation Debate Sparks Political Buzzsaam tv
Published On: 
Summary
  • शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण

  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अद्याप स्पष्टता नाही.

  • डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत

गेल्या काही दिवसापासून शरद पवार गट एनडीएसोबत जाणार, दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही, या चर्चांनी जोर धरलाय. जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं नाही तर शरद पवार गट भाजपसोबत जात एनडीएमध्ये सामील होणार आहे. याबाबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत त्याबाबत चाचपणी सुरूय. दुसरीकडे डिलिमिटेशनसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार नाही यावरून नेत्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं समोर आलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनबाबत पक्ष सकारात्मक असल्याचं विधान केलं होतं. मात्र शरद पवार गटाची भूमिका अजून स्पष्ट नाहीये. खासदारांकडून तळ्यामळ्यात असल्यासारखी विधानं केली जात आहेत.

Sharad Pawar Faction To Join NDA? Delimitation Debate Sparks Political Buzz
कमी बोला, काम जास्त करा" नगराध्यक्षांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सज्जड दम

खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव असेल, तर डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांच्या या भूमिकेला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी थेट विरोध केला. आता पक्षातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट सांगत नाहीयेत. लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलंय.

Sharad Pawar Faction To Join NDA? Delimitation Debate Sparks Political Buzz
राज्यातील ६ जिल्ह्यांत होणार नवीन अपर तहसीलदार कार्यालये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाचा संपूर्ण यादी

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा पक्ष केंद्रात एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहे. मात्र सरकारकडून डिलिमिटेशन कसं करणार आहेत याचे अजून स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस सरकार स्पष्टीकरण देईल त्यावेळेस पक्षाच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल. अशी माहिती माढ्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलीय.

दरम्यान केंद्राकडून प्रस्तावित डिलिमिटेशनमध्ये प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलंय. लोकसंख्येच्या आधारावर काही राज्यांवर अन्याय होणार नसेल आणि सर्व राज्यांना समान प्रमाणात जागा वाढवून दिल्या जाणार असतील, तर या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करता येईल, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी काही दिवसापूर्वी मांडली होती.

शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत!:त्यांच्या राज्यसभेची अजून 5 वर्षे बाकी आहेत - सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित 'एनडीए'मध्ये सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.