Digital Payment: ऑनलाइन पेमेंट महागणार! UPI आणि रुपे डेबिट कार्डवर शुल्क लागणार

UPI Payment Transaction Charges Increases: आता ऑनलाइन पेमेंट महागण्याची शक्यता आहे. यूपीआय आणि रुपे डेबिट कार्डवर शुल्क लागणार आहे.
Digital Payment
Digital PaymentSaam Tv
Published On

आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण ऑनलाइन पेमेंट करतो. यूपीआय कोड स्कॅन करुन काही सेकंदात पैसे पाठवतो. अगदी मुलाच्या शाळेची फी भरणे असो किंवा भाजी घेणे प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाइ पेमेंटचा वापर करतो. परंतु आता यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड पेमेंट महागणार आहे. (Digital Payment)

Digital Payment
EPFO News: पीएफचे पैसे UPI द्वारे ५ मिनिटांत काढा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

यूपीआय पेमेंट आणि RuPay डेबिट कार्डच्या ट्रान्झॅक्शनवर आता जास्त चार्जेस लागू शकतात. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट आता महागणार आहे. या ट्रान्झॅक्शनवर सध्या मर्चंट डिस्काउंट रेट चार्ज होतो. जो दुकानदार आपल्या बँकेला डिजिटल पेमेंट प्रोसेस करण्यावेळी देतो. सध्या सरकारने ही फी माफ केली आहे. परंतु लवकरच ही फी पुन्हा लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, बँकिंग इंडस्ट्रीकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यानुसार, ज्या दुकानदारांचे वार्षिक टर्नओवर हे ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना MDR लागू केला जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावावर सरकारने अद्याप विचार केलेला नाही. परंतु ४० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या दुकानदारांना कोणत्याही प्रकरची MDR फी लागू केली जाणार नाही.

Digital Payment
UPI PIN: डेबिट कार्डशिवाय UPI पिन कसा सेट करायचा?

या प्रस्तावानुसार, सरकार टियर सिस्टीम लागू करु शकते. म्हणजेच मोठ्या व्यापारांना जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे मोठ्या व्यापारांना दर महिन्याला होणाऱ्या डिजिटल पेमेंटवर चार्ज करावे लागणार आहे. या व्यापारांचे महिन्याला लाखो- कोट्यवधी रुपयांचे डिजिटल ट्रान्झॅक्शन असते.

Digital Payment
SBI SIP Scheme: फक्त १०,००० रुपयांची SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती; 'या' म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा अन् मालामाल व्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com