SBI SIP Scheme: फक्त १०,००० रुपयांची SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती; 'या' म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा अन् मालामाल व्हा

SBI Mid Cap And Large Cap Mutual Fund: गुंतवणूकीसाठी एसआयपी हा उत्तम पर्याय आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाँग टर्म फायदा होणार आहे.
SBI SIP
SBI SIPSaam TV
Published On

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. गुंतवणूकीसाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे एसआयपी. एसआयपीमधील गुंतवणूक ही सुरक्षित असते. ययाचसोबत तुम्ही म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीममध्येही गुंतवणूक करु शकतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

जर तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले तर तुम्ही करोडपती बनू शकतात. तुम्हाला यासाठी दर महिन्याला म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीममध्ये गुंतवणूक करावी लागेल.

SBI SIP
LIC Schemes: २०० रुपयांचे होतील २० लाख! जाणून घ्या LIC ची नवी स्कीम

लार्जकॅप आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक

तुम्ही एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. यामध्ये तुम्ही लार्जकॅप आणि मिडकॅप दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत आतापर्यंत १३.३३ टक्के रिटर्न मिळाला आहे. या योजनेत कमीत कमी ३५ टक्के फंड हा लार्जकॅप स्टॉकमध्ये असणे गरजेचे आहे.याचसोबत ३५ टक्के रक्कम ही मिडकॅपमध्ये गुंतवलेली असावी.

एसबीआय लार्जकॅप आणि मिडकॅप फंड वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या फंडमध्ये इच्छेनुसार ३० टक्के निधी गुंतवण्याचे स्वातंत्र्य आहे. फंड ३० टक्के रक्कम स्मॉलकॅप स्टॉक, डेट इन्स्ट्रुमेंट्स, मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकतात.या योजनेची सुरुवात १९९३ रोजी झाली होती.

SBI SIP
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

१० हजार रुपयांचे ३२ वर्षात ६.७५ कोटी रुपये झाले

या योजनेत जर तुम्ही जर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला ६.७५ कोटी रुपये मिळू शकतात. हा १५.७१ टक्के परतावा आहे. या योजनेत १० ते १५ वर्षांचा परतावा सरासरी १५ टक्के आहे. ५ वर्षांचा परतावा हा १८.४४ टक्के आहे. तर तीन वर्षांचा परतावा १३.६५ टक्के आहे.

एसबीआय म्युच्युअल फंड ही देशातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंनी आहे.यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

SBI SIP
Pashu Aushadhi scheme: गुरांनाही मिळणार स्वस्तात औषध! सरकारच्या 'पशुवैद्यक केंद्रा'चा कसा घेणार लाभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com