Saam Tv
युपीआय वापरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे युपीआयचा ६ अंकी किंवा ४ अंकी पिन.
हा पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्ड वापरलं जातं. मात्र आता दुसरा पर्याय आहे आधारकार्ड.
तुमचा फोन नंबर आधारकार्डला लिंक असेल तर तुम्ही युपीआय पिन सेट करू शकता.
सगळ्यात आधी UPI अॅप मोबाईलमध्ये घ्या आणि त्यात बॅंकेची माहिती भरा.
युपीआय पिन सेट करण्यासाठी तिथे दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
त्यासाठी तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाचे पहिले ६ अंक त्यात टाकून घ्या.
त्यानंतर, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला otp त्यात एंटर करा.
आता तुम्हाला हवा असलेला पिन तयार करा आणि पुन्हा otp एंटर करा. तो पिन योग्य आहे का हेही तपासून घ्या.