CJP निवडणूक लढवणार? युपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा

Cockroach Janata Party Big Announcement : उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. कॉकरोच जनता पार्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केलीय.
Cjp To Contest Up Elections 2027? Abhijeet Deepke Makes Big Announcement
Cjp To Contest Up Elections 2027? Abhijeet Deepke Makes Big Announcement
Published On: 
Summary
  • उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार

  • आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

  • कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP ने महत्त्वाची घोषण

उत्तर प्रदेशात आगामी काळात विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी भाजप आणि काँग्रेस रणनीती आखत आहे. त्याचदरम्यान सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीनं एक मोठी घोषणा केलीय. सीजेपीने एखादी भूमिका जाहीर केली की त्याचा निर्णय हा देशाच्या राजकारणावर होतो. सध्या देशात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबाबतीत सीजेपीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत. कॉकरोच जनता पार्टीचे देशभरात लाखो तरुण-तरुणी समर्थक आहेत. तरुणाईचा पाठिंबा असल्याने सीजेपीचे राजकारणातही महत्त्व वाढलंय.

त्यामुळे सीजेपी राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची कवायस लावले जात होते. त्यावरून युपी, गोव्यात होणाऱ्या निवडणुकीत सीजेपी सहभागी होईल असा अंदाज होता. मात्र सीजेपी निवडणुकीत सहभाग घेणार नसल्याची घोषणा दीपकेंनी केलीय. आगामी यूपी विधानसभा निवडणुका लढवणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलंय. दीपके एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

या निवडणुकीत आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसेल, असंही दीपके यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दीपके उतरणार नाहीत, हे आता स्पष्ट झालंय. ही घोषणा करताना निवडणुका कशा हव्यात याबाबत दीपके यांनी सविस्तर सांगितलं. या निवडणुका तरुणांच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात.

जाती, धर्मावर आपण निवडणुका लढवू नयेत. आज संपूर्ण जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीकरणीय ऊर्जेवर चर्चा करत आहे." राजकीय पक्षांनी रोजगार निर्मिती आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण हेच मुद्दे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत, असं मत दीपके यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.