Tax Saving Schemes Saam Tv
बिझनेस

Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

Top 10 Tax Saving Schemes: अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. याचसोबत या योजनांमध्ये टॅक्समध्ये सूट मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो.वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर टॅक्स जातो. परंतु तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. केंद्र सरकारच्या काही योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करा.

१. इक्विटी लिंक्ड सेंव्हिंग स्कीम

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये असा ठरावीक परतावा नसतो. या योजनेत १५ ते १८ टक्के परतावा मिळतो. या योजनेत ३ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

२. पब्लिक प्रोव्हिडंट फंड

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कलम ८०सी अंतर्गत १.५ लाखांपर्यंत करसूट मिळते. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के परतावा मिळतो.

३. नॅशनल पेन्शन स्कीम

नॅशनल पेन्शन स्कीमध्ये ९ ते १२ टक्के परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला ५०,००० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिडक्शन मिळते. या योजनेत 80CCD(1B) सूट मिळते.

४. सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वात जास्त व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही १० वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावाने अकाउंट उघडू शकतो. या योजनेत तुम्हाला अनेक टॅक्स बेनिफिट मिळतात.

५.नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत ६.८ टक्के व्याजदर मिळते.या योजनेत ५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करा. या योजनेत कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.

६. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला टॅक्सपासून सूट मिळते. फक्त ५०,००० पेक्षा जास्त व्याजावर कर लागतो.

७.५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट

या योजनेत तुम्हाला ५.५टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला टॅक्सपासून सूट मिळते.

८. युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लान

या योजनेत मार्केटच्या आधारावर व्याज मिळते. या योजनेत कलम 80C अंतर्गत १.५० लाखांवर कर सूट मिळते. त्यामुळे तुम्हाला फायदा होतो.

९. राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम

या योजनेत तुम्हाला ३ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत मार्केटच्या आधारावर व्याजदर मिळते. या योजनेत कलम 80CCG अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत कर सूट मिळते.

१०.अॅन्युटी प्लान

या योजनेत तुम्हाला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला विविध कलमाअंतर्गत कर सूट मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक फायद्याची ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT