Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Financial Crisis After Share Market Loss: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणं नाशिकच्या तरुणाला महागात पडलं. शेअर मार्केट कोसळल्यामुळे या तरुणाचे १५ लाख रुपये बुडाले. आर्थिक विवंचनेत येऊन त्याने आत्महत्या केली.
Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
Financial Crisis After Share Market LossSaam Tv
Published On

अभिजीत सोनावणे, नाशिक

शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सातपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १५ लाख रूपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत येऊन तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास नाशिक पोलिस करत आहे.

शेअर मार्केटमध्ये १५ लाख रूपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत येऊन तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवू या उद्देशाने गुंतवणूक केली. पण शेअर मार्केटमध्ये त्याला मोठा फटका बसला. या तरुणाचे शेअर्स मार्केटमध्ये १५ लाख रूपयांची रक्कम बुडाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं.

Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
Share Market Today : शेअर बाजारात वारं फिरलं, सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी घौडदौड; कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

रवींद्र शिवाजी कोल्हे असे मृत तरुणाचे नाव असून तो मुळचा चांदवड तालुक्यातील विटाई येथे राहणारा आहे. तो सध्या नाशिकच्या खुटवडनगर परिसरात राहत होता. या तरुणाने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. तो प्रारंभी मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि सध्या आरबीएल बँकेत कामाला होता. त्याने त्याला मिळत असलेले पैसे आई वडीलांना न देता शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट कोसळत असल्याने त्यात त्याचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते.

Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
Share Market Today : शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, कोणते शेअर्स ठरले टॉप लूजर्स?

शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडला होता. मात्र ऐवढी मोठी रक्कम कशी फेडणार? आई - वडीलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने पिंपळगांव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर दुचाकीवर बसून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. या घटनेत तरुण ९० टक्के भाजला. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलिस करत आहे.

Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
Share Market: गुंतवणूकदारांसाठी मंगळवार ठरला 'अमंगल'; 10 लाख कोटी रुपये स्वाहा, Stock Market मध्ये का होतेय पडझड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com