गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मार्केट पडलं, SIPही गडगडलं, मिड-स्मॉल कॅप गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका

Share Market Update News : डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाच्या घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवलीय.
Stock market falls  SIP also plummet  mid small cap investors big loss
Stock market falls SIP also plummet mid small cap investors big loss SaamTV
Published On

विनोद पाटील, साम टीव्ही

मुंबई : शेअर मार्केटची घसरण थांबायला काही तयार नाही. मात्र याचा थेट फटका एसआयपी करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. नेमकी काय आहेत याची कारणं ? एसआयपीत गुंतवणूक करावी की करू नये? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याची मानली जाते. कारण त्यातली अनिश्चितता आणि त्यामुळेच एसआयपी आणि म्युच्युअल फंड हे तुलनेनं सुरक्षित गुंतलणुकीचा पर्याय मानले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची सातत्यानं घसरण सुरू आहे. आणि याचा थेट परिणाम आता एसआयपी आणि म्युच्युअल फंडावरही झालाय. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणूक तोट्यात गेलीय. याचा सर्वाधिक फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. त्यामुळेच अर्थ तज्ज्ञांनी एसआयपीतल्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय.

Stock market falls  SIP also plummet  mid small cap investors big loss
Top 10 Headlines @ 3 PM : बजेटनंतर शेअर मार्केट आपटून पुन्हा सावरलं, मुख्यमंत्री फडणवीसांकडून बजेटचं कौतुक, 'जीबीएस'चे ५ बळी.. वाचा टॉप हेडलाइन्स

एसआयपी गुंतवणूकदारांनो सावधान!

- भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र

- घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवरही

- एसआयपीद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक तोट्याची

- स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते

- लार्ज कॅपमधील गुंतवणूक ठरु शकते फायद्याची

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाच्या घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवलीय. त्याचाच देशी गुंतवणूकदारांना फटका बसलाय. यामुळे मात्र एसआयपीत गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात.

Stock market falls  SIP also plummet  mid small cap investors big loss
Union Budget 2025: अर्थसंकल्पाच्या दिवशी बँका अन् शेअर मार्केट सुरू राहणार का? RBI ने दिली महत्त्वाची माहिती

२०२४ हे शेअर बाजार, म्यच्युअल फंड आणि एसआयपीसाठी ऑल टाईम हिट ठरलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरूवातीलाच गुंतवणूकदारांना फटका बसलाय. अखेर हे शेअर मार्केट आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनो घाबरून जाऊ नका. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शन घ्या आणि गुंतवणूक करा.

Stock market falls  SIP also plummet  mid small cap investors big loss
Online Fraud : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये २६ लाखांची फसवणूक; भंडारा पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com