
नितीन पाटणकर, साम टीव्ही
शेअर बाजारात गेल्या ९ दिवसांपासून मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गेल्या ९ दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. आज बाजारात थोडीफार उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत आहे. शेअर बाजारात घसरण सुरु असताना एसआयपी गुंवणूदारांनाही मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. यावर चार्टर्ड अकाउंटेंट रचना रानडे यांनी मोठं भाष्य केलं आहे.
चार्टर्ड अकाउंटेंट रचना रानडे यांनी शेअर बाजारातील पडझडीनंतरच्या परिणामावर मोठं भाष्य केलं आहे. एसआयपीच्या गुंतवणुकीवर भाष्य करताना चार्टर्ड अकाउंटेंट रचना रानडे म्हणाल्या, 'एसआयपी स्वरूपात गुंतवणूक केलीच पाहिजे. शेअर बाजार पडत असतो, तेव्हा गुंतवणूक करण्याची संधी असते. बाजार पडत असताना गुंतवणूक केल्यास एव्हरेज कॉस्ट कमी येते. गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये'.
दिर्घकाळ गुंतवणुकीवर बोलताना रानडे म्हणाल्या, 'लॉन्ग टर्म गोल अचिव करण्यासाठी एसआयपीतील गुंतवणूक असते. ती कायम ठेवावी. तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या दहा टक्के गुंतवणूक ही सोन्यामध्ये असावी. सोन्यामधील गुंतवणूक ही स्थिरता देते. शॉर्ट गोलसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करावी. एफडीतील गुंतवणुकीमधूनच शॉर्ट गोल होऊ शकतात'.
शेअर बाजार कोसळण्यावरही रचना रानडे यांनी प्रतिक्रिया दिली. 'सध्या मार्केट कोसळत आहे. त्यामागे अनेक फॅक्टर्स आहेत. आधी ही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यूएस बाँडमधील ईल्ड हे एक महत्त्वाचं कारण आहे. यात सध्या चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार तिथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. डोमेस्टिक ग्रोथ कमी झालेली आहे. कृपया डॉलरच्या तुलनेत पडत आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा परतावा कमी झाला आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.