- बजेटनंतर शेअर मार्केट आपटून पुन्हा सावरलं. ८२ मिनिटांत गुंतवणूकदारांचं २.४१ लाख कोटींचं नुकसान.
- नवीन कररचनेचा मध्यमवर्ग तरुणांना फायदा होईल, देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून बजेटचं कौतुक.
- भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. दोघांमध्ये दीड तास चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
- राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह. सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी.
- फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा. राज्यातील थंडी संपली, सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज.
- मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महागला. प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार.
- पुण्यात 'जीबीएस'नं टेन्शन वाढवलं. मृतांची संख्या पाचवर तर रुग्णसंख्या १४० वर
- मध्य रेल्वेवर आज कल्याण-वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक. ११.५१ ला सुटणार शेवटची कर्जत लोकल.
- शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्यूचं गुढ उलगडलं. सख्या भावानंच अशोक धोडींना संपवलं. गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध.
- फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर. सर्व शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन.
- मुंबईतील काही भागात ५ आणि ६ फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद. नवीन जलवाहिनीचं करणार काम. बीएमसीची माहिती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.