Jagdeep Singh Saam Tv
बिझनेस

Jagdeep Singh: अबब बाबो! दिवसाला ४८ कोटी, या भारतीयानं सर्वाधिक सॅलरीचे सर्वच रेकॉर्ड मोडले!

Highest Paid CEO Jagdeep Singh: भारतीय वंशाचे जगदीस सिंह हे दिवसाला ४८ कोटी रुपये कमावतात. त्यांची वार्षिक सॅलरी ही १७,५०० कोटी रुपये आहे.

Siddhi Hande

आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. चांगल्या पगाराची नोकरी मिळवून प्रत्येकालाच चांगले आयुष्य जगायचे असते. जगातील सर्वात जास्त पगार घेणारा व्यक्ती हा भारतीय आहे. मूळचे भारतीय असलेले जगदीप सिंह हे जगातील सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती आहेत. त्यांचा दिवसाचा पगार ४८ कोटी रुपये आहे.

जगदीप सिंह हे क्वांटमस्केप (QuantumScape)चे फाउंडर आणि सीईओ आहेत. जगदीप सिंह यांची वर्षाची कमाई १७,५०० कोटी रुपये आहे. म्हणजेच त्यांचा रोजचा पगार ४८ कोटी रुपये आहे.

जगदीप सिंह यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी खूप कमी वयात खूप मोठी झेप घेतली आहे. ते जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

जगदीप सिंह यांनी २०१० साली QuantumScape ची स्थापना केली. कंपनी सॉलिड-स्टेट बॅटरीवर काम करते. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चांगल्या प्रकारे काम करतात आणि चार्जिंगच्या वेळेलादेखील कमी करण्यासाठी मदत करतात. दूरदर्शी नेतृत्व क्षमता लक्षात घेऊन क्वांटमस्केप कंपनीची स्थापना केली जाते.

QuantumScape कंपनीचे संस्थापक जगदीप सिंह यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून B.Tech केले. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॉलिफोर्नियामधून एमबीए केला.

जगदीप सिंह यांना चांगले पॅकेज मिळाले आहे. त्यांच्या सॅलरी पॅकेजमध्ये तब्बल २.३ कोटी बिलियन डॉलर स्टॉकचा समावेश आहे. जगदीप सिंह यांनी खूप कमी कालावधीत झेप घेतली आहे.

रिपोर्टनुसार, जगदीप सिंह यांनी कंपनी ही इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रगती करणाऱ्या कंपनीमध्ये लीडर बनत आहे. यामुळे कंपनीचा टर्नओव्हरदेखील चांगला आहेत. ही कंपनी पारंपारिक लिथियम- आर्यन बॅटरीपेक्षा चांगल्या बॅटरी बनवते. यामुळे चार्जिंगचा कालावधी कमी होतो.

२०२४ मध्ये जगदीप सिंह यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२४ रोजी शिवा शिवराम यांना पदभार दिला. ते आता फक्त संचालक मंडळावर काम करणार आहे. भारतीय वंशाचे जगदीप सिंह हे जगात सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT