Washim Zp : जिल्हा परिषदेच्या ३ हजार कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा; सीईओ वाघमारे यांच्या विरोधात आंदोलन

Washim News : वाशीम जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना शाळेत विनाईल बोर्ड लावण्यासाठी स्वखर्चातून ५० हजार रुपयेपर्यंत रक्कम खर्च करायला लावली
Washim Zp
Washim ZpSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी; या मागणीसाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी १ ऑक्टोबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात तीन हजार पेक्षाही जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. वैभव वाघमारे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून असविधानिक काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. 

वाशीम (Washim) जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना शाळेत विनाईल बोर्ड लावण्यासाठी स्वखर्चातून ५० हजार रुपयेपर्यंत रक्कम खर्च करायला लावली. तसेच अंगणवाडी सेविकांना बोलकी अंगणवाडी हा उपक्रम राबविण्यासाठी लोकवर्गणी करायला जबरदस्ती केली. तर कार्यालयात येण्यासाठी उशीर झाला तर वाघमारे कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. यासारख्या त्यांच्या नियमबाह्य वागणुकीमुळे कर्मचारी त्रस्त झाल्याचा (Zilha Parishad) आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. 

Washim Zp
Shahapur News : माळीण व इरसलवाडीच्या पुनरावृत्तीची शक्यता; कसारा येथे भूस्खलनाने घर कोसळले

तोपर्यंत सामूहिक रजा  

या सर्व त्रासामुळे सीईओ वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी, अशी प्रमुख मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जोवर बदली होत नाही; तोवर सामूहिक आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com