Shahapur News : माळीण व इरसलवाडीच्या पुनरावृत्तीची शक्यता; कसारा येथे भूस्खलनाने घर कोसळले

Shahapur News : कसारा गाव हा वन विभागाच्या जागेवर वसलेले आहे. यामुळे चारही बाजूंनी डोंगर असून दरवर्षी भूस्खलन होऊन कोणत्या ना कोणत्या भागातील घरे कोसळत असतात
Shahapur News
Shahapur NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

शहापूर : माळीण व इरसलवाडी येथे भूस्खलन होऊन संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कसारा गावात निर्माण झाली आहे. दरम्यान भूस्खलन होऊन कसारा येथील विठ्ठलवाडी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली. यात मोठे नुकसान झाले आहे.  

शहापूर (Shahapur News) तालुक्यातील कसारा गाव हे डोंगरावर वसलेले आहे. शासकीय भूखंडावर हे गाव डोंगर दऱ्याखोऱ्यात वसल्याने पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होऊन घरे कोसळत असतात. त्यानुसार आज सकाळच्या सुमारास वाळू किर्वे यांचे घर कोसळले आहे. या घटनेत जीवीतहानी झाली नसली तरी घरातील अन्न, धान्य, वस्त्र व घरातील वस्तू ढिगारेखाली अडकले आहेत. यांची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अहवाल सादर करणार आहेत.

Shahapur News
Nashik Crime : ऑफिस बॉयनेच दिली मालकाला लुटण्याची सुपारी; पोलीस तपासात माहिती आली समोर, टोळीला अटक

कुटुंबांची हवी कायमची व्यवस्था 

कसारा गाव हा वन विभागाच्या (Forest department) जागेवर वसलेले आहे. यामुळे चारही बाजूंनी डोंगर असून दरवर्षी भूस्खलन होऊन कोणत्या ना कोणत्या भागातील घरे कोसळत असतात. दर वर्षी महसूल विभागाच्या वतीने भूस्खलन होणाऱ्या ठिकाणाहून बहुतेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतात. मात्र या ठिकाणी या कुटुंबाची कायमची व्यवस्था केली जात नाही. कालांतराने या कसारा गावात मोठी दुर्घटना घडल्या शिवाय राहणार नाही. म्हणून काही ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com