TDS  Saam Tv
बिझनेस

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी; TDS आणि TCS भरण्याची उद्या शेवटची तारीख, आजच भरा अन्यथा...

TDS And TCS File Last Date: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टीडीएस, टीसीएस भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्यांनी भरला नाही त्यांनी तातडीने भरा अन्यथा तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता टॅक्स डिडक्टे़ड अॅट सोर्स म्हणजेच टीडीएस/ टिसीएस जमा करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. टीडीएस भरण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे. त्यामुळे तुमच्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तुम्ही जर उद्यापर्यंत टीडीएस भरला नाही तर तुम्हाला पेन्लटी भरावी लागेल. टीडीएस आणि टिसीएस म्हणजे काय?तो का फाइल करावा लागतो? याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

TDS आणि TCS म्हणजे काय?

टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्सचा उद्देश सरकारला महसूल मिळवून देणे असा आहे. याअंतर्गत काही निश्चित देयकांवर म्हणजे काही ठरलेल्या गोष्टींवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. हा टीडीएस कर व्यवसायांना लागू होतो. ज्यांचा व्यवसाय आहे. जे लोक लहान-मोठे उद्योग चालवतात. तेव्हा ते लोक खरेदीदारांकडून जो कर वसूल करतात. तो सरकारला द्यावा लागतो.

टीडीएस, टीसीएस कसा जमा करायचा?

कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या करदात्यांना आयकर कलम 44AB अंतर्गत टॅक्स ऑडिटमध्ये असलेल्यांना टीडीएस, टिसीएस भरावा लागतो.करदाते याचे पेमेंट ITNS 281 द्वारे करु शकतात.

टीडीएस/ टीसीएस जमा करण्याची अंतिम तारीख

तुम्ही ७ मार्च २०२५ म्हणजे उद्यापर्यंतच टीडीएस/ टिसीएस भरु शकतात. अन्यथा तुम्हाला शुल्क भरावे लागतील.

टीडीएस/ टीसीएस भरला नाही तर?

जर तुम्ही टीडीएस किंवा टीसीएस भरला नाही तर तुम्हाला डिफॉल्ट म्हणून मानले जाईल. त्यामुळे तुम्ही जर वेळेत पैसे दिले नाही तर व्याज द्यावे लागेल. तसेच दंडदेखील भरावा लागेल. जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वीस गावांना जोडला जाणारा लोकवर्गणीतून बांधलेला पूल गेला वाहून

Mumbai Shocking : तरुणी ३ महिन्यांपासून बेपत्ता; पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड, कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली

Mumbai To Aklola Travel: मुंबई ते अकोला प्रवास कसा करायचा? बस, ट्रेन, कार आणि फ्लाइट पर्याय

Crime: वहिनीसोबत अनैतिक संबंध, तरुणाकडून सख्ख्या भावाची हत्या; डोक्यात दगड घालत घेतला जीव

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

SCROLL FOR NEXT