सचिन बनसोडे
कोपरगाव : घर उभारणीसाठी लागणारी वाळू उपसा करण्यासाठी गोदावरी नदीवर काही वाळू डेपो निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या वाळू डेपो व्यतिरिक्त अन्य काही ठिकाणावरून अवैधपणे वाळू उपसा केला जात होता. यासाठी बोटींचा वापर करण्यात येत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने कारवाई केली असून वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी उध्वस्त केल्या आहे.
सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता राज्य शासनाने माफक दरात वाळू उपलब्ध करण्याकरिता शासकीय वाळू डेपो चालू केले. त्याचप्रमाणे राज्यातील पहिला शासकीय वाळू डेपो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात देण्यात आला आहे. त्यानंतर कोपरगाव तालुक्यात कुंभारी, माहेगाव देशमुख, सुरेगाव पाठोपाठ मायगाव देवी येथे देण्यात आला. यावर कोपरगाव महसूल विभागाची निगरानी ठेवण्यात आली होती.
दोन बोटी केल्या उध्वस्त
मात्र गेल्या काही दिवसापासून मायगाव देवी येथे गोदावारी नदीपात्रात देण्यात आलेल्या शासकीय वाळू उपसा व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून बोटीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू तस्करी केली जात होती. हा वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली असता प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत व महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करत दोन बोटी उद्वस्त केली. तर एक बोट अर्धवट पाण्यात बुजावण्यात आली.
वाळू तस्करांना दणका
अचानक झालेल्या महसूल विभागाच्या कारवाईने वाळू तस्करात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे महसूल विभाग आणखी काही कारवाई करते का? हे नंतरच कळेल. याप्रसंगी प्रांतधिकारी माणिक आहेर यांच्यासह तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप कोळी, उपनिरिक्षक चौधरी, कोपरगावचे मडळाधिकारी श्री. पोकळे, मायगाव देवीचे तलाठी सौरभ धुमाने, प्रविण डहाके तसेच महसुल व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई करून दणका दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.