Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२व्या वर्षी IAS होणाऱ्या सुलोचना मीना आहेत तरी कोण?

Success Story of IAS Sulochana Meenna: आयएएस सुलोचना मीना यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सर्वात अवघड असते. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही कोणतीही परीक्षा क्रॅक करु शकतात. असाच विश्वास सुलोचना मीना यांना स्वतः वर होता. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

आयएएस सुलोचना मीना (IAS Sulochana Meena) या मूळच्या राजस्थानच्या सवाई माधोपुरच्या रहिवासी. त्या आपल्या जिल्ह्यातील पहिला महिला आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. वयाच्या फक्त २२ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं आहे. आयएएस व्हायचे हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. ते त्यांनी पूर्ण केले.

पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी (IAS In First Attempt)

सुलोचना मीना यांनी वयाच्या फक्त २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. २०२० मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. याचसोबत त्या रोज वर्तमानपत्र वाचायच्या. त्यांना आजूबाजूच्या जगात काय चाललंय याबाबत सर्व माहिती असायची. त्यांनी दिवसरात्र एक करुन अभ्यास केला आहे.

सुलोचना यांनी एनसीईआरटीची पुस्तके वाचली. यातून त्यांना चांगला फायदा झाला. त्यांनी ४० ते ५० टेस्ट सीरीज दिल्या. यामुळे त्यांना खूप फायदा झाला. त्या भारतातील सर्वात तरुण आयएएस ऑफिसर्सपैकी एक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT