Success Story: ९ वर्षे नोकरी केली, नंतर चौथ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; बापाच्या स्वप्नासाठी लेक बनली IAS

Success Story Of IAS Kajal Jawla: आयएएस काजल जावला यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा दिली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशीच मेहनत आयएएस काजल जावला (IAS Kajal Jawla) यांनी केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या आयएएस पदावर कार्यरत आहे.

Success Story
Success Story: अंध मुलासाठी आईच बनली दृष्टी; लेकाने केली UPSC क्रॅक; मायलेकाची यशोगाथा वाचून डोळे पाणावतील

आयएएस काजल जावला यांनी नोकरी करताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी ९ तासांची नोकरी करताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली.त्यांनी आपल्या अभ्यासावर आणि नोकरीवर लक्ष दिले.

२०१८ मध्ये काजल जावला यांनी आयएएस प्रिलियम्स परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी मेन्स परीक्षेत १७५० पैकी ८५० गुण प्राप्त केली. त्यांनी २८वी रँक प्राप्त केल.

काजल यांना त्यांच्या वडिलांनी सिविल परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांना प्रिलियम्स परीक्षेत सतत अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी देशातील सर्वात अवघड परीक्षा क्रॅक केली.

काजल या ऑफिसला जाताना ३ तास कॅबमध्ये अभ्यास करायची. सुट्टीच्या दिवशी त्यांनी पूर्ण दिवस अभ्यास केला. त्यांनी यूपीएससी(UPSC Exam) परीक्षेत वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरली.

Success Story
Success story: माझी आई, माझे कान आणि आवाज आहे! कर्णबधीर असूनही जिद्दीच्या जोरावर रत्नाकर यांनी गाठलं यशाचं शिखर

काजल मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी. त्यांनी मथुरा येथील इंजिनियरिंग कॉलेजमधून बीटेक पूर्ण केले. यानंतर त्यांनी इंजिनियरिंग केल्यानंतर विप्रो कंपनीत नोकरी केली. त्यांना २३ लाखांचे पॅकेज मिळाले. त्यांनी जवळपास ९ वर्षे प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केली.

काजल यांच्या वडिलांची त्या आयएएस व्हाव्यात अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी नोकरीसोबत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या चौथ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी बनल्या.

Success Story
Success story: माझी आई, माझे कान आणि आवाज आहे! कर्णबधीर असूनही जिद्दीच्या जोरावर रत्नाकर यांनी गाठलं यशाचं शिखर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com