MNS Protest : हिंदी सक्तीचा वाद चिघळणार! मनसेककडून हिंदी माध्यमांची पुस्तके जाळण्याचा प्रयत्न

maharashtra nep controversy : हिंदी सक्तीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मनसेककडून हिंदी माध्यमांची पुस्तके जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
mumbai News
mumbai newssaam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही

पहिलीपासून हिंदी सक्तीचा वाद चिघळणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेने हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तके जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.

mumbai News
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार? माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ

शासनाच्या हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घाटकोपरमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. घाटकोपर पश्चिम भागात हिंदी माध्यमाची पाठ्यपुस्तके जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं. यावेळ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली आहे

mumbai News
लातूरमध्ये वादळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; वीज पडून जनावरांचे गोठे जळाले

वर्सोवामध्ये मनसे आक्रमक

महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आक्रमक मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली. मनसैनिकांनी हिंदी सक्ती अध्यादेश कागदाचा फाडून होळी केली. हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द न झाल्यास उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईत फिरू देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.

mumbai News
wardha Flood : पुराच्या पाण्यात युवकासह दोन बैल गेले वाहून, पण...; थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद

मनसेकडून अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आंदोलन केले. मनसैनिकांची राज्य शासन आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हिंदी भाषा सक्ती विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचाही इशारा दिला.

ठाण्यातही मनसे आक्रमक

मराठी भाषेची गळचेपी करून शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या शासन निर्णयाविरोधात आज शुक्रवारी ठाण्यात मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी हिंदी भाषेचा विरोध करणाऱ्या कागदाचे पोस्टर फाडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com