IAS Shraddha Gome Saam Tv
बिझनेस

IAS Shraddha Gome: लंडनमधील नोकरीला रामराम, UPSC ची तयारी, पहिल्याच प्रयत्नात IAS; श्रद्धा गोमे यांची कहाणी एकदा वाचाच

Siddhi Hande

देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर सरकारी नोकरीत अधिकारी पदावर रुजू होण्याची संधी मिळते. आयएएस ऑफिसर होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असंच यश श्रद्धा गोमे यांनी मिळवलं आहे.

श्रद्धा गोमे या मूळच्या मध्यप्रदेशच्या आहेत. त्यांचे वडील रमेश कुमार हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होते. तर आई वंदना या गृहिणी होत्या. श्रद्धा गोमे यांनी इंदोर येथील शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्या १०वी आणि १२वी च्या परिक्षेत प्रथम आल्या होत्या. (Success Story)

श्रद्धा गोमे यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी CLAT परीक्षा दिली. श्रद्धा या CLATच्या परिक्षेतदेखील पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बंगळुरु येथे अॅडमिशन घेतले. या काळात त्यांना १३ गोल्ड मेडलने सन्मानित केले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून त्यांना गौरवण्यात आले होते.

श्रद्धा यांनी हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये नोकरी केली. लंडन येथील ऑफिसमध्ये त्यांनी कायदा मॅनेजर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतदेखील काम केले होते.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवे. त्यांनंतर त्या पुन्हा मायदेशी परतल्या. त्यांनी इंदोरमध्ये यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी इंटरनेटवरुन अभ्यास केला. त्यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस लावण्यापेक्षा सेल्फ स्टडी करण्याला प्राधान्य दिले. (Success Story Of IAS Shraddha Gome)

२०२१ मध्ये श्रद्धा यांनी यूपीएससी परीक्षा दिला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी प्रिलियम आणि मुख्य परीक्षेत यश मिळवले. त्यानंनी ऑल इंडिया रँक (AIR)मध्ये ६० वे स्थान पटकावले. त्यांचे हे यश अनेक तरुणांना प्रेरित करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT