IAS Smita Sabharwal:फक्त २३ व्या वर्षी IAS ऑफिसर, कोण आहेत स्मिता सभरबाल? जाणून घ्या

IAS Smita Sabharwal Success Story: मेहनत केल्याने प्रत्येक व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होतो. असंच यश स्मिता सभरवाल यांनी वयाच्या २३ व्या वर्षी मिळवलं आहे. त्या सध्या आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
IAS Smita Sabharwal
IAS Smita SabharwalSaam Tv
Published On

प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी शिक्षण हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे माणूस आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. खूप मोठ्या पदावर काम करु शकतो. देशातील सर्वात जास्त प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससीची परीक्षा पास करुन देशातील सर्वात मोठ्या पदावर आपण काम करु शकतो. वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास करुन स्मिता सभरवाल यांनी मोठे यश मिळवले आहे.

स्मिला सभरवाल यांचा जन्म १९ जून १९९७ रोजी दार्जिलिंगमध्ये झाला. त्या आर्मी कर्नल प्रणब दास यांच्या घरात झाला. त्यांनी लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली.

IAS Smita Sabharwal
Success Story: शेतजमीन भाड्याने घेऊन राबला; आता उभारली १२०० कोटींची कंपनी, तरुणाची यशोगाथा वाचून अवाक् व्हाल!

स्मिता सभरवाल यांनी खूप कमी वयात यूपीएससीची परीक्षा पास करुन यश मिळवले आहे. स्मिता सभरवाल यांनी तेलंगणामध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद येथील सेंट फ्रॅन्सिस कॉलेज ऑफ वुमन येथून कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. त्या ऑइल इंडिया इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच आयसीएससी (ICSC) बोर्डातून प्रथम आल्या होत्या.

स्मिता सभरवाल यांनी खूप कमी वयात देशातील सर्वात मोठ्या पदावर काम केले. त्यांना लोकांचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. तेलंगणा, वारांगल, विशाखापट्टणम, करिनगर, चित्तूर या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. स्मिता यांनी खूप लहान वयात मुख्यमंत्री कार्यालयात काम केले आहे.

IAS Smita Sabharwal
Success Story: उधारीवर पुस्तके, इंटरनेटसाठी रोज पायपीट, युट्यूबवरुन शिक्षण; NEET पास; आता डॉक्टर होणार,आदिवासी मुलाची यशोगाथा वाचा

स्मिता या २००१ च्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहे. त्यांनी २००० साली यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्या सध्या तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी खूप लहान वयात यश मिळवले आहे.

IAS Smita Sabharwal
Success Story: शिक्षिका ते सर्वात श्रीमंत महिला YouTuber, रेसिपी दाखवून करतात कोट्यवधींची कमाई; वाचा सक्सेस स्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com