Mumbai Fraud: क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगायचे अन् नागरिकांना लुटायचे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५ जण अटकेत

Maharashtra Latest News: मुंबईत मागील अनेक दिवसापासून नागरिकांना पोलिस असल्याचे सांगून फसवणारी टोळी सक्रिय आहे. अशाच एक बोगस पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे.
Mumbai Fraud: क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगायचे अन् नागरिकांना लुटायचे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५ जण अटकेत
Maharashtra Latest News:Saamtv
Published On

संजय गडदे, मुंबई|ता. १४ सप्टेंबर २०२४

Mumbai Fraud News: पोलीस असल्याचे सांगून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे. एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या नागरिकाला क्राइम ब्रांच पोलीस असल्याचे सांगून 5 लाख रुपये घेऊन पळ काढलेल्या व्यक्तींविरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.या तक्रारीची दखल घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Fraud: क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगायचे अन् नागरिकांना लुटायचे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५ जण अटकेत
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर शिवसैनिक आज शिंदे गटात प्रवेश करणार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईत मागील अनेक दिवसापासून नागरिकांना पोलिस असल्याचे सांगून फसवणारी टोळी सक्रिय आहे. अशाच एक बोगस पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वा सुमारास खार पोलीस ठाणे ह‌द्दीतील कॅनरा बॅक येथे फिर्यादी हे कॅश डिपॉझीट मशीनमध्ये रक्कम भरण्यासाठी गेले व काही रक्कम डिपॉझीट करून ते बाहेर आले.

त्यावेळी दोन व्यक्ती ए.टी एम मशीनच्या गेटवर आले व त्यांनी फिर्यादी यांस "आम्ही काईम बॅच मधून आलो आहे. तुम्हाला चौकशी कामी क्राईम ब्रँच येथे घेवून जात आहोत असे सांगुन फिर्यादीस पांढऱ्या रंगाची कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचेकडे५,००,०००/-रू रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Mumbai Fraud: क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगायचे अन् नागरिकांना लुटायचे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५ जण अटकेत
Crime News : अ‍ॅप्रन पकडला अन्... महिला डॉक्टरवर हल्ला; हैदराबादच्या गांधी हॉस्पीटलमध्ये रूग्णाचा प्रताप!

दरम्यान, गुन्हयाच्या घटनास्थळ व जवळपासच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासणी, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संदेश दत्ताराम मालाडकर, ५१ वर्षे यास आचरा जि सिंधुदुर्ग येथुन मोटार सायकलसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.

तसेच याच गुन्हयातील उर्वरित ४ आरोपीना अंधेरी येथील हॉटेलमधुन पोलीस पथकाने ताब्यात घेवुन त्यांना या गुन्हयात अटक केलेली आहे. संदेश दत्ताराम मालाडकर, (५१ वर्षे), प्रफुल्ल शंकर मोरे (४६ वर्षे), विकास श्रीधर सुर्वे (३९ वर्षे) चेतन केम्पे गौडा (३४ वर्षे) दर्शन महेश यागनिक (४३ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Mumbai Fraud: क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगायचे अन् नागरिकांना लुटायचे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५ जण अटकेत
Girish Mahajan: भाजपचे संकटमोचक संकटात सापडले! ग्रामस्थांचा रोष अन् गिरीश महाजनांनी काढला पळ; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com