Crime News : ऐकावे ते नवलच! वर्धा जिल्ह्यात दारूबंदी, त्यानं लढवली अजब शक्कल, पण पोलिसाच्या सापळ्यात कसा अडकला?

Wardha Crime News : दुधाच्या कॅनमधून दारुची विक्री करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपीची ही शक्कल मात्र जास्त दिवस टिकली नाही.
Wardha Crime News
Wardha Crime NewsWardha Crime News
Published On

Wardha Latest Crime News : वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे.येथे दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जातं असल्याचं अनेकदा समोर आलेय. आरोपीची आयडिया मात्र जास्त दिवस टिकत नाहीत. पोलिसांच्या तपासात सत्य समोर येतेच. अशातच आता चक्क दुधाच्या कॅनमधून दारूची वाहतूक करत असल्याचं समोर आले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वर्धा येथीलस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला अटक केली. तो दुधाच्या कॅनमधून दारुची वाहतूक करत होता.

ही कारवाई कळंब ते वर्धा मार्गावर नाकाबंदीदरम्यान रात्रीच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दुचाकीसह १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रशांत रामेश्वर कोंबे (४२, रा. साठोडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिस पथक देवळी परिसरात गस्त घालत असताना यवतमाळ जिल्ह्यातून दारूची तस्करी होणार असल्याचे समजले. पोलिसांनी कळंब ते वर्धा मार्गावर नाकाबंदी केली असता मोटारसायकल (क्र. एमएच ३२ एल ३७६३) येताना दिसली. पोलिसांनी पाहणी केली असता आरोपी प्रशांत मोटरसायकलचे दोन्ही बाजूला दूध वाटपाकरिता वापरण्यात येणाऱ्या कॅनमध्ये विदेशी दारूचा माल बाळगून त्याची अवैधरीत्या विक्रीकरिता वाहतूक करताना आढळून आला. त्याने हा दारूसाठा कळंब येथील मनीष जैयस्वाल याच्या वाइन शॉपीतून खरेदी केल्याचे सांगितल्याने मनीष जैस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मकेश ढोके यांनी केली. पोलिसांनी जिल्हाभर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com