Chai Sutta Bar Owner: व्हायचे होते IAS पण झाला चहावाला; ३ लाखात व्यवसायात उतरला, आता १५० कोटींचा मालक, वाचा Success Story

Chai Sutta Bar Owner Anubhav Dubey Success Story: आयुष्यात कितीही अपयश आले तरीही खचून न जाता प्रयत्न केल्याने यश मिळते.असंच यश चाय सुट्टा बार या ब्रँडचे मालक अनुभव दुबे यांना मिळाले.
Chai Sutta Bar Owner:
Chai Sutta Bar Owner:Saam Tv
Published On

मेहनत केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होतो. कितीही वेळा अपयश आले तरीही न डगमगता त्याचा सामना करुन जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो तोच माणूस यशस्वी होतो. असंच यश चाय सुट्टा बारचा मालक अनुभव दुबे याने मिळवलं आहे. अनुभव दुबे यांच्या चाय सुट्टा बार या दुकानाचे संपूर्ण देशभरात आउटलेट आहेत.

अनुभव दुबे यांना आयुष्यात अनेकदा अपयशांचा सामना करावा लागला. अनुभव दुबे यांना सरकारी विभागात काम करायचे आहे. त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी केली होती. मात्र, त्यांना या परीक्षेत अपयश आहे. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. (Chai Sutta Bar Owner Anubhav Dubey Success Story)

Chai Sutta Bar Owner:
Success Story: शेतजमीन भाड्याने घेऊन राबला; आता उभारली १२०० कोटींची कंपनी, तरुणाची यशोगाथा वाचून अवाक् व्हाल!

अनुभव दुबे यांनी व्यवसाय करायचे ठरवले ते त्यांच्याकडे भांडवल नव्हते. त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप मेहनतीने ३ लाखांचे भांडवल उभे केले. त्यानंतर त्यांनी स्वतः चे चहाचे पहिले दुकान सुरु केले. यानंतर त्यांनी प्रगती केली.

अनुभव दुबे यांच्या 'चाय सुट्टा बार' (Chai Sutta Bar) या शॉपची संकल्पना खूप वेगळी आहे. मातीच्या कुल्हडमध्ये चहा देण्याची ही संकल्पना लोकांना खूप आवडली. हळूहळू त्यांचा चहा ग्राहकांना खूप आवडू लागला. आता त्यांचे देशभरात ४०० आउटलेट आहेत.

Chai Sutta Bar Owner:
IAS Smita Sabharwal:फक्त २३ व्या वर्षी IAS ऑफिसर, कोण आहेत स्मिता सभरबाल? जाणून घ्या

देशभरातील १९५ शहरांमध्ये चाय सुट्टा बारचे शॉप (Chai Sutta Bar Outlets) आहेत. चाय सुट्टा बार हा ब्रँड दिवसेंदिवस ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. या ब्रँडचं वार्षिकउत्पन्न १५० कोटी रुपये आहे. अनुभव दुबे यांच्या कहानीतून अपयश आल्यानंतरही खचून जायचे नाही आणि प्रयत्न करत राहायचे, हा गुण शिकण्यासारखा आहे.

Chai Sutta Bar Owner:
Success Story: शिक्षिका ते सर्वात श्रीमंत महिला YouTuber, रेसिपी दाखवून करतात कोट्यवधींची कमाई; वाचा सक्सेस स्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com