Tea And Pesticides : तुमच्या चहामध्ये कीटकनाशकं? धक्कादायक अहवालाने चहा पिण्याआधी उडाली सर्वांची झोप, पाहा व्हिडिओ

Tea And Pesticides news : तुम्हीही चहा शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची...कारण तुम्ही पिताय तो चहा विषारी आहे...होय, चहामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळलाय...चहा शौकीनांना धडकी भरवणारी ही बातमी आहे... कोणत्या चहामध्ये कीटकनाशकं आढळलीयत पाहुयात हा रिपोर्ट...
Tea Lover Country
TeaSaam TV
Published On

मुंबई : सकाळी सकाळी गरमागरम चहा भुरकूर पित असाल तर ही बातमी आणि सावध व्हा...कारण, तुम्ही पित असलेल्या चहामध्ये कीटकनाशकं असू शकतात.चहामध्ये कीटकनाशकं आढळलीयत. हे आम्ही म्हणत नाहीये. तर असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चक्क चहा पावडरमध्ये कीटकनाशकाचा अंश आढळून आलाय.

हा चहा तर तुम्ही पित नाही ना...प्रसिद्ध चहा ब्रँड असणाऱ्या सपट चहामध्ये मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या कीटकनाशकाचा अंश आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Tea Lover Country
Ghee Tea Recipe : सकाळची सुरुवात करा एक कप तूप चहाने; आरोग्याला मिळतील थक्क करणारे फायदे

कोणकोणत्या चहामध्ये कीटकनाशकं आढळलीयत हे पाहुयात...

सपट चहाच्या 4 प्रकारच्या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकाचा अंश आढळला. सपट परिवार फॅमिली ब्लेंड, सपट हॉटेल डस्ट, सपट सह्याद्री इलायची, सपट सह्याद्री कडक या चहांचा समावेश आहे . 4 प्रकारच्या चहाच्या 8 पैकी काही नमुन्यांमध्ये 0.23 टक्के तर काहींमध्ये त्यापेक्षाही जास्त कीटकनाशकांचा अंश आढळला. म्हैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झालंय.

खरं तर या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकांचा अंश असल्याचा संशय अन्न आणि औषध प्रशासन विभागाला खूप आधीच आला होता...अधिकाऱ्यांनी संशयित चहाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी देखील पाठवले होते. मात्र पुण्याच्या प्रयोगशाळेने नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट मैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेत संबंधित चहाचे नमुने पाठवल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Tea Lover Country
Green Tea : ग्रीन टी आरोग्यासह केसांसाठी फायदेशीर....

धक्कादायक बाब म्हणजे या प्रसिद्ध चहाच्या ब्रँडकडे केंद्राच्या FCCI विभागाचा परवानादेखील आहे... आता राज्यात या चहामध्ये कीटकनाशकांचा धोकादायक अंश आढळून आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई सुरू करण्यात आलीय. मात्र, कीटकनाशकंवाली चहा प्यायल्याने गंभीर आजार होऊ शकतात...कॅन्सर, पोटाचे विकार होऊ शकतात...त्यामुळे तुम्ही पित असलेली चहा पावडर आरोग्यास घातक नाही ना? हे पाहून घ्या..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com