GST Council Meeting: कॅन्सरचे औषध होणार स्वस्त, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे  निर्णय
GST Council Meeting

GST Council Meeting: कॅन्सरचे औषध होणार स्वस्त, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत GST परिषदेची 54 वी बैठक पार पडली. यात सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी भाग घेतला. या बैठकीत कर्करोगावरील उपचार आणि फराळावरील कर कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Published on

सोमवारी दिल्लीत आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. GST कौन्सिलच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. या GST परिषदेची 54 वी बैठक होती. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय कॅन्सरच्या औषधासंदर्भात घेण्यात आलाय. आजच्या बैठकीत कॅन्सरचे औषध स्वस्त करण्यावर निर्णय झाला. सरकारने कर्करोगावरील औषधांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीत आरोग्य विम्यावरील कर कमी करण्याबाबत चर्चा झाली, मात्र याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे. दरम्यान जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले हे जाणून घेऊ. आजच्या जीएसटी काउंसिल बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम म्हणाल्या, कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी कमी केली जाणार आहे. कॅन्सरवरील उपचार स्वस्त होण्यासाठी जीएसटी १२ टक्क्यांवरुन कमी करत ५ टक्क्यांवर आणले गेले.

नमकीनच्या एक्सट्रुडेड विस्तारित चवदार खाद्यपदार्थांवरही निर्णय घेण्यात आलाय. यावरील जीएसटी दर १८ वरून १२ टक्के करण्यात आलाय. सचिवांच्या समितीने IGST (इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स) कसे वाढवले पाहिजेत, हे स्पष्ट करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज निर्णय घेतला.

आयजीएसटीवर निगेटिव्ही बॅलन्समध्ये आहे. म्हणजे मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी पैसे आहेत. यासंदर्भातदेखील जीएसटी परिषदेने निर्णय घेतला. पुढील रणनिती अंतिम करण्यासाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र दोन्ही अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून कमी करण्यात आलाय. परंतु त्यावर अंतिम निर्णय झालेला नाहीये.

आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे २००० रुपयांपर्यंतच्या छोट्या ऑनलाइन व्यवहारांसाठी पेमेंट एग्रीगेटरवर १८ टक्के जीएसटी लावण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतीही घोषणा केली नाहीये. सध्या हे प्रकरण फिटमेंट समितीकडे पाठवण्यात आले आहे.

GST Council Meeting: कॅन्सरचे औषध होणार स्वस्त, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे  निर्णय
Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com